पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाचा पुढाकार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, April 8, 2021

पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाचा पुढाकार

 पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाचा पुढाकार

जातीअंतच्या लढाईसाठी सविनय जातीसंहिता भंगाची चळवळीची घोषणा


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः
जातीय अंताची लढाई म्हणून पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी बुधवार दि.14 एप्रिलला सविनय जातीसंहिता भंगाची चळवळ सुरु केली जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पध्दतीने या चळवळीचा शुभारंभ करुन विश्वबोधी सुर्यनामा करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.
भारतात अनेक वर्षापासून जाती व्यवस्था अस्तित्वात आहे. यामुळे राजकिय, सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विषमता वाढून दुबळ्या घटकांचे शोषण झाले. जातीच्या नावावर अनेकांनी पोळ्या भाजून स्वत:ची घरे भरली. मात्र दुबळे घटक विकासापासून आजही वंचित आहे. तंत्रज्ञान व विज्ञानाच्या युगात जाती अंताच्या लढाईला महत्त्व प्राप्त झाले आहे. उन्नतचेतना ही बायोलॉजिकल बिलिफ इनरिचमेंट तंत्राने सर्व अडथळ्यांवर मात करता येत असल्याचे संशोधनाने सिध्द झाले आहे. हे तंत्र जगभर स्विकारण्यात आले. जैविक उन्नतचेतना, जेनिटिक व नॉनजेनिटिक इन्फरमेशन या तीन गोष्टींवर मनुष्याची प्रगती होते. जात, धर्म व पंथाला विज्ञान व निसर्गाचा आधार नसल्याने हे भेद संपणार आहेत. जात मागील जन्माच्या कर्मावर आधारित असल्याचे तत्वज्ञान मोडित निघाले आहे. उन्नतचेतनेवर आधारित जैविक धारणेचा विकासाने समाजातील अज्ञान दूर होऊन प्रगती साधता येणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीअंतच्या लढाईसाठी दिलेला लढा क्रांतीकारक असून, त्यांच्या विचाराने व त्यांचा वारसा घेऊन ही लढाई या चळवळीच्या माध्यमातून यशस्वी करण्यासाठी संघटनांनी पुढाकार घेतला आहे. या चळवळीसाठी अ‍ॅड. गवळी, अशोक सब्बन, कॉ.बाबा आरगडे, माजी कुलगुरु सर्जेराव निमसे, जालिंदर बोरुडे, विठ्ठल सुरम, शाहीर कान्हू सुंबे, अशोक भोसले, हिराबाई ग्यानप्पा, अंबिका नागुल आदी प्रयत्नशील आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here