बौद्ध संस्कारच्यावतीने ‘भीम पहाट’ कार्यक्रमाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, April 14, 2021

बौद्ध संस्कारच्यावतीने ‘भीम पहाट’ कार्यक्रमाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

 बौद्ध संस्कारच्यावतीने ‘भीम पहाट’ कार्यक्रमाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः बौद्ध संस्कार संघाच्यावतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ‘भीम पहाट’ हा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आला. प्रारंभी बुद्ध वंदना, पुजा पठण संपन्न झाले. प्रारंभी बौद्धाचार्य भाऊसाहेब देठे यांच्याकडून डॉ.बाबासाहेबांच्या एक सुरेल आठवणीतील ‘तथागत गौतम बुद्धांचे त्रिसरण व पंचशील’ हे सुफी गायक पवन नाईक यांनी सादर केले. त्यास पंकज नाईक (संवादिनी) स्मिता राणा (सतार), जितेंद्र रोकडे (बासरी), कुलदीप चव्हाण (बेंजो), स्मिता मेस्त्री, प्राची पाठक, विजय जाधव व प्रतिक चव्हाण (सहगायक व सहवादक) यांनी साथ दिली. विणा दिघे यांनी निवेदन केले.
मिलिंद ठोर यांनी ‘फुलवारे सारे मानवतेचा मळा, माझ्या भिमानं लावलाय लळा’ हे गीत सादर केले. तृष्णा ठोसर यांनी ‘ज्ञान पिपासू युगंधराच्या आठवणींना सरुन साजरी भिम जयंती करु’ हे गीत गायले. तसेच राष्ट्रीय वंदनगीत कवी शाहिर मुक्तानंद जगताप यांनी स्वहस्त लिखित ‘शिवराया, भिमराया तुम्हा त्रिवार घ्या वंदना’ हे गीत सादर केले.
अनेक मान्यवरांनी ऑनलाईन वरुन जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात 2009 पासून चित्रफितद्वारे फोटो, ऑनलाईन पद्धतीने दाखविण्यात आले. बौद्ध उपासकांनी या कार्यक्रमासाठी मदत केली त्यांचेही आभार मानण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.दिलीप गायकवाड, अनिल आंबावडे, डी.सी.तरकसे, प्रा.विश्वासराव कांबळे, प्रमोद साखरे, एल.डी. मधाळ, बाबासाहेब भांबळ, एम.बी.साळवे, सुनिल होवाळ, भाऊसाहेब सोनवणे, सुनिल बोरुडे, किशोर वाघमारे, अरविंद शिंदे आदिंनी परिश्रम घेतले. सारंग लोखंडे यांनी व्हिडिओ एडिटिंग केले. मानसी देठे यांनी सर्वांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment