सर्वसामान्यांची गरज ओळखून करण्यात आलेला उपक्रम कौतुकास्पद -आ. जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, April 16, 2021

सर्वसामान्यांची गरज ओळखून करण्यात आलेला उपक्रम कौतुकास्पद -आ. जगताप

 सर्वसामान्यांची गरज ओळखून करण्यात आलेला उपक्रम कौतुकास्पद -आ. जगताप

बडी साजन येथे अत्यल्प दरात कोविड चाचणी तपासणी केंद्राचा शुभारंभ


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोरोना काळात मागील एक वर्षापासून जय आनंद फाउंडेशन विविध माध्यमातून समाजसेवेचे कार्य करत आहे. त्यांच्या या कार्याला मनापासून सलाम केला पाहिजे. कोरोनाचे संकट काळात नागरिकांची लवकरात लवकर कमी पैश्यात तपासणी व्हावी, या उद्देशाने सर्वसामान्यांची गरज ओळखून सुरू करण्यात आलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.
नगर जिल्ह्यातील वाढती रुग्ण संख्यामुळे कोविड चाचणीचा अहवाल येण्यास 3 ते 4 दिवस लागत आहे. परिस्तिथीचे गांभीर्य लक्षात घेऊन जय आनंद फाउंडेशन व क्रस्ना डायग्नोस्टिक यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड 19 आरटी-पीसीआर चाचणी अत्यल्प दरात (600 रु.) सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. आनंदऋषीजी हॉस्पिटल येथील बडी साजन येथे या कोविड चाचणी तपासणी केंद्राचा शुभारंभ आमदार जगताप यांच्या हस्ते झाला यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जय आनंद फाउंडेशनचे संस्थापक कमलेश भंडारी, अध्यक्ष रितेश पारख, सचिव सुमित लोढा, बडीसाजन श्री संघाचे सुमतीलाल कोठारी, अनिल लुंकड, राजेंद्र ताथेड, विशाल शेटीया, मनोज शेटीया, क्रस्ना लॅबचे डॉ. अमित धारकर, मनपा विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, अभिजित खोसे, भुपेंद्र परदेशी, महेंद्र उपाध्ये आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार जगताप म्हणाले की, सध्या जिल्ह्यातील रुग्ण नगर शहरातील रुग्णालयात येत असल्याने आरोग्य यंत्रणावर निश्चित थोडासा ताण पडला आहे. मागील आठवड्यात रेमडीसिविर इंजेक्शनचा तुटवडा झाला होता. पण आता मुबलक इंजेक्शन प्रत्येक रुग्णालयात आहे. पुढील परिस्तिथी पाहता येत्या काही दिवसात नगर शहरात जास्तीत जास्त  इंजेक्शन कसे उपलब्ध करता येईल त्या अनुषंगाने पाठपुरावा चालू असल्याचे त्यांनी सांगितले.
सुमित लोढा यांनी जय आनंद फाउंडेशनने मागील वर्ष भरात विविध समाज उपयोगी केलेल्या कार्याची माहिती देत, संघटनेचे संस्थापक व मर्चंट बँकेचे संचालक कमलेश भंडारी यांच्या मातोश्रीच्या मागील महिन्यात निधन झाले. तरी सुध्या ते आपले दुःख बाजूला सारत आपल्या संघटनेतील युवकांना सोबत घेऊन सामाजिक कार्य करत असल्याचे सांगितले.आमदार संग्राम जगताप हे मागील एक वर्षांपासून ग्राउंड लेव्हलवर कार्य करीत असून, गरजूंना आवश्यकती सर्व मदत करत असल्याचे मत विशाल शेटिया यांनी मांडले. या कोविड चाचणी केंद्रात नाममात्र 600 रुपयात प्रति व्यक्तीची कोविड 19 आरटी- पीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. त्याचा अहवाल चोवीस तासांमध्ये तपासणी करणार्या  व्यक्तीच्या मोबाईलमध्ये ऑनलाइन देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना वेळेत व गर्दी न करता कोरोना चाचणीचा अहवाल मिळणार असून, याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment