माजी सैनिकाची हत्या; 4 आरोपी गजाआड. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, April 12, 2021

माजी सैनिकाची हत्या; 4 आरोपी गजाआड.

 माजी सैनिकाची हत्या; 4 आरोपी गजाआड.

हॉटेल समोर गाडी उभी करण्यावरून वाद.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः हॉटेल समोर गाडी उभी केल्याच्या कारणावरून माजी सैनिकाची हत्या करणार्‍या चार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. या आरोपींवर जेजुरी व पाथर्डी पोलीस ठाण्यात यापूर्वीच गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. मच्छिंद्र शिरसाठ हे हत्या झालेल्या माजी सैनिकाचे नाव आहे.
सदर घटनेची हकीकत अशी की, पाथर्डी टाकळी फाटा येथील साईप्रेम हॉटेल समोर विश्वनाथ कारभारी फुंदे यांनी सुधीर शिरसाठ यास हॉटेल समोरून गाडी बाजूला घेण्यास सांगितले. त्याचा राग मनात धरून आरोपी सुधीर शिरसाठ याने त्याचे इतर साथीदारांना तेथे बोलवून घेवून फिर्यादीचे भाऊ मच्छिंद्र शिरसाठ यांना लोखंडी पाइप व रॉडने मारहाण करून त्यांना जबरदस्तीने गाडीमधून तिलोक जैन विद्यालय, पाथर्डी या शाळेच्या पाठीमागे आणून जबरदस्तीने दारू पाजून पुन्हा लोखंडी पाइप व रॉडने मारहाण करून त्यांची हत्या केली. त्याबाबत पाथर्डी पो.स्टे. गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा घडल्यानंतर पोलिस अधीक्षक अहमदनगर, अपर पोलिस अधीक्षक अहमदनगर,  उपविभागीय पोलिस अधिकारी शेवगाव विभाग यांनी गुन्हा घडलेल्या ठिकाणी भेट देवून गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्ह्यातील आरोपींचा स्वतंत्र पथक नेमून शोध घेण्याबाबत पोनि.अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे मिथु घुंगे, मनोहर गोसावी, सचिन आडबल, विशाल दळवी, संतोष लोंढे, रोहित येमुल, विनोद मासाळकर, जालिंदर माने, मेघराज कोल्हे, यांचे तसेच मा. उपविभागीय पोलिस अधिकारी, शेवगाव विभाग यांचे कार्यालयातील निलेश म्हस्के, भगवान सानप, राहुल खेडकर यांचे स्वतंत्र पथक नेमले होते. गुन्हातील आरोपी सुधीर शिरसाट याचा शोध घेत असताना माहिती मिळाली की, आरोपी सुधीर शिरसाट हा कानडगाव, ता. राहुरी परिसरातील डोंगरांमध्ये त्यांचे साथीदारांसह लपून बसलेला आहे. पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी कानडगाव येथे जावून तेथील परिसराची माहिती घेऊन सापळा लावून व डोंगरांमध्ये पाठलाग करून एकूण 4 इसमांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. एक इसम डोंगरांमध्ये पळून गेला. त्याचा पथकातील पोलीस अमदारांनी पाठलाग केला परंतु तो मिळून आला नाही. ताब्यात घेतलेल्या इसमांना त्यांची नावे, पत्ते विचारले असता त्यांनी सुधीर संभाजी शिरसाट, वय-26 वर्ष रा.आसरा नगर, आकाश पांडुरंग वारे वय-24 वर्षे रा.शिक्षक कॉलनी, आकाश मोहन डुकरे वय-21 वर्षे रा.विजयनगर, गणेश सोन्याबापु जाधव वय-23 वर्षे रा.शंकर नगर, सर्वजण पाथर्डी असे असल्याचे सांगितले. तसेच पळून गेलेल्या इसमाबाबत यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी पळून गेलेल्या इसमाचे नाव केतन जाधव, रा.शिक्षक कॉलनी पाथर्डी असे असल्याचे सांगितले. आरोपींना विश्वासात घेऊन नमूद गुन्हाबाबत त्यांच्याकडे विचारपूस केली असता आरोपी सुधीर संभाजी शिरसाट यांनी व त्याचे साथीदार अशांनी मिळून गुन्हा केला असल्याची माहिती दिली आहे.
ही कारवाई मा.मनोज पाटील पोलीस अधीक्षक, सौरभ कुमार अग्रवाल अपर पोलीस अधीक्षक, सुदर्शन मुंढे उपविभागीय पोलिस अधिकारी शेवगाव विभागयाचे सूचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

No comments:

Post a Comment