जैन साधू-साध्वी भगवंतांना विहार करण्यास मुभा द्यावी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, April 14, 2021

जैन साधू-साध्वी भगवंतांना विहार करण्यास मुभा द्यावी

 जैन साधू-साध्वी भगवंतांना विहार करण्यास मुभा द्यावी

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः  महाराष्ट्र राज्यामध्ये 30 एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. त्यामुळे जैन साधू- साध्वींना येण्या-जाण्यास प्रतिबंध येणार आहे.

महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते.सर्व संत हे समाजाला,मनुष्याला जगण्याची चांगली दिशा देतात, मार्गदर्शन करतात. धार्मिक संत,मुख्यत्वे जैन साधू - साध्वी भगवंत हे धार्मिक कारणासाठी,समाजात मानवता,अहिंसा,शांती तसेच धार्मिक प्रचारासाठी संपूर्ण भारतभर एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाण्यास पूर्णपणे फक्त आणि फक्त पायी विहार (पदभ्रमण) करत असतात. त्यांच्या बरोबर अतिशय निवडक 2-3 सेवक त्या दरम्यान सोबत असतात.ते सकाळी 5 ते 9 आणि संध्याकाळी 4 ते 6.30 दरम्यान पायी विहार करत असतात. त्यांनी संसाराचा त्याग केला असल्याने त्यांचा आहार हा गोचरी (भिक्षा) स्वरूपात घेण्यासाठी जवळील रहिवासी भागात जावे लागते.
अनेक गुरुभगवंत आज विहार करत आहेत.अश्या नवीन निर्णयाने त्यांना विहार दरम्यान अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल.जसे राहायची सोय, गोचरी ची सोय होऊ शकत नाही.
वरील सर्व सद्य परिस्थितीचा विचार करुन अखिल भारतीय जैन श्वेतांबर गुजराती समाज महासंघ वतीने राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र शाह यांच्या नेत्रुत्वात अल्पसंख्यांक समिती उपप्रमुख, यश प्रमोद शहा यांनी तात्काळ इमेल द्वारे निवेदन प्रत मा. राज्यपाल मा.कोश्यारी साहेब, मुख्यमंत्री मा.ठाकरे साहेब,उपमुख्यमंत्री मा. पवार साहेब,गृहमंत्री मा.वळसे पाटील साहेब, विरोधी पक्षनेते,मा.फडणवीस साहेब, अल्पसंख्यांक मंत्री मा.मलिक साहेब, अल्पसंख्यांक राज्यमंत्री मा.कदम साहेब, जिल्हाधिकारी डॉ. भोसले साहेब,जिल्हा पोलिस अधीक्षक पाटील साहेब यांना पाठवली आहे तसेच सर्व कार्यालयांशी सम्पर्क करून विनंती देखील केली की तात्काळ गृहविभागास व महाराष्ट्र राज्या मधील सर्व जिल्हा पोलीस प्रशासन आणि जिल्हाधिकारी प्रशासनाला आदेश द्यावा की साधू संतांना या बाबत संपूर्ण सहकार्य करावे. कुठेही त्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी.आवश्यकता असल्यास आपण त्यांना पोलीस संरक्षण विहार दरम्यान द्यावे .
 मा.प्रदीपजी वळसे पाटील साहेबांना महासंघवतीने यश शहा यांनी केलेल्या विनंतीनुसार गृहमंत्री साहेबांशी याबाबत तात्काळ बोलणे करुन ,पाटील साहेबांनी त्यावेळी त्यांनी यात सम्पुर्ण सहकार्य करण्यात ये़ईल असे शहा यांना कळवले आणि शक्य असल्यास आहे त्या ठिकाणी थांबावे आणि सर्वानी काळजी घ्यावी अशी विनंती गुरुभगवंताना करावी असे आवर्जुन सांगीतले. तसेच लस बाबतही बोलु असे सांगीतले.

No comments:

Post a Comment