जैन समाजासह सर्व जाती धर्माच्या साधुसंताना प्राधान्याने करोना प्रतिबंधक लस द्यावी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, April 9, 2021

जैन समाजासह सर्व जाती धर्माच्या साधुसंताना प्राधान्याने करोना प्रतिबंधक लस द्यावी

 जैन समाजासह सर्व जाती धर्माच्या साधुसंताना प्राधान्याने करोना प्रतिबंधक लस द्यावी

दिनदयाळ परिवाराचे वसंत लोढा यांची मुख्यमंत्रींकडे मागणी


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः संपूर्ण देशात करोना प्रतिबंधक लसीकरण पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे राबवले जात आहे. या लसीकरणामुळे नक्कीच आपण करोनावर मात करू शकणार आहोत. मात्र सध्या हे लसीकरण फक्त ज्याच्या कडे आधारकार्ड आहे अशाच नागरिकांना होत आहे. देशात सर्व जाती धर्माचे लाखो साधू संत मंडळी आहेत की ज्यांना आधारकार्डची कधीच गरजच पडली नाही. त्यामुळे हे सर्व साधुसंत मंडळी करोना प्रतिबंधक लस घेण्यापासून वंचित राहू शकतता. त्यामुळे सरकारने या सर्व साधुसंतांचे लसीकरण आधारकार्ड शिवाय प्राधान्याने करून द्यावे. नगर शहरात असलेले आनंदधाम हे जैन समाजाचे महत्वाचे स्थानक आहे. आज याठिकाणी अनेक साधू साध्वी वास्तव्यास आहेत. अद्याप त्यांचेही लसीकरण झालेले नाहीये. सर्व धर्मांची शिकवण ही मानवधर्माचीच आहे. त्यामुळे मानवता व विचार टिकण्यासाठी साधुसंतांची आज फार गरज आहे. यासाठी नगर मधील सर्व जैन समजाच्या साधू संताचे तसेच सर्व जाती धर्माच्या साधूसंतांना तातडीने लस देण्यास प्राधान्य द्यावे, अशी मागणी भाजपाचे जेष्ठनेते वसंत लोढा यांनी दीनदयाळ परिवाराच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इमेल द्वारे पाठवलेल्या निवेदनात केली आहे.
निवेदनावर वसंत लोढा यांच्या सह बापू ठाणगे, प्रा. सुनील पंडित, सुहासभाई मुळे, धनंजय तागडे, बाळासाहेब भुजबळ, अनिल शर्मा, हरिभाऊ डोळसे, प्रा.मधुसूदन मुळे, गौतम कराळे, बाळासाहेब खताडे, सोमनाथ चिंतामणी आदी सदस्यांच्या सह्या आहेत. वसंत लोढा यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन गोयल, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, नगर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडेही हे निवेदन पाठवून साधुसंताना तातडीने लसीकरण करण्याची मागणी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here