महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, April 6, 2021

महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त

 महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त

नागरदेवळे येथे मोफत नेत्रतपासणी शस्त्रक्रिया शिबीर


अहमदनगर ः
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त फिनिक्स सोशल फाऊंडेशन यांचे वतीने शुक्रवार दि.9/4/2021 रोजी मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू, काचबिंदू, तिरळेपणा शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन नागरदेवळे येथील  संत सावता महाराज मंदिर येथे सकाळी 9 ते 3 या वेळेत आयोजित केलेले आहे. तरी गरजू रुग्णांनी या मोफत शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन फिनिक्स फाऊंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी केले आहे.
सदर शिबीरात सर्व रुग्णांची मोफत नेत्रतपासणी करण्यात येऊन ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज भासेल अशा रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येईल. रुग्णांची राहणे, जेवणाची मोफत व्यवस्था करण्याची आलेली आहे.  कोरोना प्रादुर्भावामुळे शासनाचे सर्व नियम पाळून हे शिबीर होणार आहे. तरी सर्व गरजू रुग्णांनी नांव नोंदणी व अधिक माहितीसाठी श्री. जालिंदर बोरुडे मो.नं. 9881810333 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment