रक्ताचा भासत असलेला तुटवडा रक्तदान शिबिरांतून भरुन काढावा : आ. जगताप. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, April 13, 2021

रक्ताचा भासत असलेला तुटवडा रक्तदान शिबिरांतून भरुन काढावा : आ. जगताप.

 रक्ताचा भासत असलेला तुटवडा रक्तदान शिबिरांतून भरुन काढावा : आ. जगताप.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कै.बाळासाहेब देशपांडे रक्तपेढी सुरू...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर महापालिकेच्यावतीने कै. बाळासाहेब देशपांडे या नावाने जनतेला अहोरात्र चांगली आरोग्य सेवा देण्याचं काम आपण करत आहोत. या दवाखान्याचा नावलौकिक संपूर्ण राज्यभर आहे. जिल्ह्याभरातून महिला प्रसुतीसाठी येथे मोठ्या संख्येने येत असतात. याच बरोबर गेल्या अनेक वर्षापासून या दवाखान्यात रक्तपेढी सुरु होती. परंतु गेल्या 7 महिन्यापासून रक्तपेढी काही कारणास्तव बंद होती. आज गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर रक्तपेढी पुन्हा सुरु करण्यात आली असून. रक्तपेढी सुरु करण्यासाठी स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांनी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा केला असल्याचे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.
याप्रसंगी आ.संग्राम जगताप म्हणाले की, ही रक्तपेढी पूर्णक्षमतेने सुरू राहण्यासाठी रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे. रक्ताचा तुटवडा भासत असताना कै. बाळासाहेब देशपांडे रक्तपेढीने हा तुटवडा भरुन काढावा. 2017 साली रक्तपेढीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या मशिनरी उपलब्ध करून देण्यासाठी नाविन्यपूर्ण योजनेतून 1 कोटी 20 लाखांचा निधी उपलब्ध करून दिला होता. माजी नगराध्यक्ष कै. शंकरराव घुले यांनी गोरगरिबांना रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी रक्तपेढी सुरु करुन आपल्या देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते 24 एप्रिल 1986 रोजी शुभारंभ केला होता. यावेळी बोलताना सभापती घुले म्हणाले की, गेल्या 7 महिन्यापासून आपली रक्तपेढी बंद होती. आ. संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ही रक्तपेढी सुरु करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरु केले व आज गुडी पाडव्याच्या मुहूर्तावर सुरु करण्यात आली. सर्वसामान्य नागरिकाला अल्पदरात रक्तपुरवठा केला जात होता. कोरोना संसर्ग विषाणूच्या काळामध्ये तर संपूर्ण राज्यभर रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. यापुढील काळात आपली रक्तपेढी रक्तदान शिभिरांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रक्तसाठा उपलब्ध करुन घेईल व सर्वसामान्य रुग्णांना नियमित रक्तपुरवठा करेल, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी डॉ. शेडाळे म्हणाले की, आधुनिक तंत्रज्ञानाचे रक्तपेढीसाठी उपयुक्त असे सर्व साधने महापालिकेकडे उपलब्ध आहेत. येत्या 16 तारखेला ही रक्तपेढी अधिक जोमाने चालण्यासाठी विविध पदांची भरती केली जाणार आहे. एम.डी. पॅथॉलॉजिस्ट, टेक्निल सुपरवायझर, लॅब टेक्निकल, स्टाफ नर्स, पीआरओ अशी विविध पदे भरण्यात येणार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नवीन टिळकरोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये इंजिनिअर परिमल निकम यांच्या नेतृत्वाखाली भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, असे ते म्हणाले. याप्रसंगी स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, विरोधीपक्ष नेता संपत बारस्कर, नगरसेवक प्रकाश भागानगरे, उपायुक्त यशवंत डांगे, डॉ. शंकर शेडाळे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here