मनपाच्या सावेडी येथील लसीकरण केंद्राची महापौरांनी केली पाहणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, April 13, 2021

मनपाच्या सावेडी येथील लसीकरण केंद्राची महापौरांनी केली पाहणी

 मनपाच्या सावेडी येथील लसीकरण केंद्राची महापौरांनी केली पाहणी

नागरिकांना शासनाच्या नियमांचे पालन करण्याची विनंती


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता रूग्णांची संख्या दिवसें दिवस वाढत आहे. 45 वर्षा वरील नागरिक देखील लस घेण्यासाठी मनपाच्या आरोग्य केंद्रावर गर्दी करित आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी नागरिकांनी मास्कचा वापर करावा , वारंवार सॅनिटायझरने हात धुवावे, सामाजिक अंतराचे पालन करावे. रूग्णांची संख्या वाढल्यामुळे रूग्णांना आवश्यक असणारा रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी वाढली. इजेक्शनच्या तुटवडयामुळे मुख्यमंत्री मा.ना.श्री.उध्दवजी ठाकरे साहेब, आरोग्यमंत्री मा.ना.श्री.राजेशजी टोपे साहेब पालकमंत्री मा.ना.श्री.हसनजी मुश्रीफ साहेब यांना इंजेक्शन पुरवठा तातडीने करणे बाबत पत्र देण्यात आले. शासनाने देखील दखल घेवून रेमडेसिवीर इंजेक्शन पुरवठा शहर व जिल्हयासाठी केला आहे. मनपाच्या वतीने रूग्णांना दिलासा देण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी देखील स्वत:ची व आपल्या परिवाराची दक्षता घ्यावी. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये. अत्यंत आवश्यकता असल्यासच घराच्या बाहेर पडावे.
महानगरपालिकेच्या सावेडी येथील आरोग्य केंद्रास मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे यांनी भेट देवून पाहणी केली असता त्या ठिकाणी नागरिकांनी गर्दी केली. यावेळी मनपाच्या कर्मचा-यांना खडे बोल सुनावले. तसेच नागरिकांना देखील शिस्तीचे पालन करावे, सामाजिक अंतर ठेवून रांगेत उभे रहावे. आपल्यामुळे दुस-यांना त्रास होवू नये असे ते म्हणाले. लसीकरण करण्यासाठी सुचनांचे पालन केल्यास सर्वांना लस मिळणार. मनपाच्या तोफखाना, केडगांव, सावेडी, मुकुंदनगर, नागापूर आरोग्य केंद्रावर लसीकरण करण्यात येत आहे. या ठिकाणी देखील नागरिकांनी गर्दी करू नये. शिस्तीचे पालन करून लस घ्यावी अशी विनंती केली.  कोरोना रूग्णांनी घाबरून न जाता कोवीड सेंटर मध्ये दाखल होवून योग्य ते उपचार घ्यावेत असे त्यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment