संचारबंदी असल्याने शुक्रवारीच महात्मा ज्योतिबा फुले जंयती साजरी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, April 10, 2021

संचारबंदी असल्याने शुक्रवारीच महात्मा ज्योतिबा फुले जंयती साजरी

 संचारबंदी असल्याने शुक्रवारीच महात्मा ज्योतिबा फुले जंयती साजरी


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः स्त्री शिक्षणाचे जनक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जंयती निमित्त माळीवाडा वेस येथे महात्मा फुले उत्सव समितीच्या वतीने त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. शनिवार व रविवारी संचारबंदी असल्याने शुक्रवारी संध्याकाळी जयंती साध्या पध्दतीने साजरी करण्यात आली. यावेळी उत्सव समितीचे कमलेश जंजाळे, बंडू आंबेकर, गणपत चेडे, केशव मोकाटे, भारत जाधव, ओंकार लेंडकर, स्वप्नील बोरूडे, आशिष खंदारे, अक्षय गाडळकर, विकी कानडे, धनंजय म्हस्के, केदार रासकर, मोहीत चौधरी, राहूल शेळके आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment