काष्टीत चार बिबट्याचा धुमाकुळ तीन शेळ्या व कुत्रे फस्त - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, April 15, 2021

काष्टीत चार बिबट्याचा धुमाकुळ तीन शेळ्या व कुत्रे फस्त

 काष्टीत चार बिबट्याचा धुमाकुळ तीन शेळ्या व कुत्रे फस्त


श्रीगोंदा ः
श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी (गवतेमळा) येथे गेली आठ दिवसापासून चार बिबट्यांनी तीन शेळ्या व तीन कुत्रे फस्त करित धुमाकुळ घातला आहे. बिबट्याच्या दहशतीने नागरिक हैराण झाले आहेत.  या भागातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले आहे.यावर वन खात्याकडून चार दिवस झाले पिंजरा लावून सुद्धा  बिबट्या पिंजर्‍यात येईना.
 सविस्तर माहिती अशी कि काष्टी अजनुज रोडवर गवतेमाळा येथे गेली आठ दिवसापासून माणिकराव बापुराव गवते,सुनिल बाबासाहेब गवते, यांच्या तीन शेळ्या तर शंकर बुवासाहेब गवते यांचे एक व इतर दोन कुत्रे बिबट्याने खाल्ले आहे. यामुळे  बिबट्याची एक मादी व दोन पिल्ले परिसरात वावरताना येथील नागरिकांनी प्रत्यक्ष  पाहिले आहे. दि.12 रोजी सकाळी 7 वाजता परिसरातील नागरीकांना चार बिबट्याचे दर्शन नागरिकांना झाले. यामध्ये दोन पिल्ले व दोन मोठे बिंबटे आहे.घटनेची माहिती वन अधिकारी राजेंद्र भोगे यांना दिली असता  त्यांनी वनपाल घालमे,गुंजाळ, बुरहांडे ,लक्ष्मण लगड,मुराद तांबोळी यांना पाठवत गवते यांच्या ऊसाच्या शेतात चार दिवसापासून  पिंजरा लावला आहे.तरी बिबटे  पिंजर्‍यात जाईना या भागात संपूर्ण  ऊसाचे क्षेत्र आहे.तर आता उन्हाळ्याचे दिवस असल्याने घोडचे आवर्तन सुटले आहे.शेतीला पाणी देण्यासाठी अनेकांना शेतावर जावे लागते परंतु बिबट्याच्या भितीने लोक घराच्या बाहेर पडेना आता तर बिबट्या दिवसा लोक वस्ती मध्ये येथून येथील कुत्रे घेऊन जातोय यावर वन विभागाने गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी शिवप्रसाद जगताप, बंडू गवते, चंद्रकांत गवते, डॉ.बाळासाहेब पवार, अतुल गवते मुक्ता कोकाटे यांच्यासह नागरीकांची मागणी  आहे.

No comments:

Post a Comment