राज्य सरकार गोंधळलेल्या अवस्थेत आहे ः माजी मंत्री कर्डिले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, April 9, 2021

राज्य सरकार गोंधळलेल्या अवस्थेत आहे ः माजी मंत्री कर्डिले

 राज्य सरकार गोंधळलेल्या अवस्थेत आहे ः माजी मंत्री कर्डिले

राहुरी मतदार संघातील प्रत्येक गांवात लसीकरण केंद्र सुरू करावे


अहमदनगर ः
कोरोना संसर्ग विषाणूने नगर जिल्हा धोकादायक वळणावर पोहोचत असल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.  जिल्हा प्रशासनाने आरोग्य संदर्भातील जलद गतीने विविध उपाय योजना कराव्यात कोरोना विषाणू हा संसर्ग विषाणू असल्यामुळे एका नागरिकांपासून अनेक नागरिकांना संसर्ग होण्याची भ्रिती असते यासाठी राहुरी मतदार संघातील नगर तालुका, पाथर्डी तालुका व राहुरी तालुक्यामधील प्रत्येक गांवात लसीकरण केंद्र सुरू करावेत जेणे करून एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही. तालुक्यातील मोठमोठया बाजारपेठांच्या गांवामध्ये कोरोना सेंटर व चाचणी केंद्र सुरू करावेत दिवसे दिवस मृत्युचे प्रमाण वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये भिती पसरली आहे. प्रत्येक गांवामध्ये कोरोनाचे रूग्ण मोठया प्रमाणात सापडत आहेत. ग्रामीण भागातही आता कोरोनाची भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य सरकारच्या उपाय योजना कमी पडत असल्याच्या निदर्शनात येत आहे. प्रशासनावरती या सरकारचा कोणताही धाक नाही तीन पक्षाचे सरकार मधील मंत्र्याचा गोंधळ चव्हाटयावर येत असल्यामुळे हे सरकार अस्वस्थ झाले आहे. एकामागून एक मंत्र्यांना आपल्या पराक्रमामुळे राजीनामा देण्याची वेळ येत आहे त्यामुळे हे सरकार गोंधळलेल्या अवस्थेत असल्यामुळे कोरोना संदर्भात उपाय योजना करण्यास वेळ लागत असल्याचे माजी मंत्री मा.श्री.शिवाजीराव कर्डीले यांनी केले.
नगर तालुक्यातील बुर्‍हाणनगर येथील कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रास भेट देवून माजी मंत्री शिवाजीरा कर्डिले यांनी माहिती घेतली. यावेळी बाजार समितीचे उपसभापती मा.श्री.संतोष म्हस्के, खरेदी विक्री संघाचे श्री.सुरेश सुभे, श्री.हरिभाऊ कर्डिले, श्री.बाबासाहेब खडसे, श्री.बन्सी कराळे, श्री.रभाजी सुळ, श्री.रावसाहेब कर्डिले, श्री.रेवण चोभे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment