होगानस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने व नवजीवन प्रतिष्ठानच्या सहकार्यातून चिचोंडी पाटील येथील आरोग्य केंद्रास 30 बेड व कोविड प्रतिबंधक साहित्य भेट - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, April 24, 2021

होगानस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने व नवजीवन प्रतिष्ठानच्या सहकार्यातून चिचोंडी पाटील येथील आरोग्य केंद्रास 30 बेड व कोविड प्रतिबंधक साहित्य भेट

 होगानस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने व नवजीवन प्रतिष्ठानच्या सहकार्यातून चिचोंडी पाटील येथील आरोग्य केंद्रास 30 बेड व कोविड प्रतिबंधक साहित्य भेट

कोरोना संकट काळात सामाजिक बांधिलकी जोपासावी- डॉ.दिलीप पवारनगरी दवंडी

अहमदनगर- कोरोना संसर्ग विषाणूंचा प्रादुर्भाव नगर जिल्ह्यामध्ये झपाट्याने वाढ होता आहे त्यामुळे मानवी आरोग्य जीवनावर दुष्परिणाम होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या संकट काळामध्ये प्रत्येकाने सकारात्मक दृष्टिकोनातून मदत केली पाहिजे त्याच बरोबर कोरोना बाधित रुग्णांना मानसिक आधार देण्याचे काम प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. नवजीवन प्रतिष्ठानच्या माध्यमातून एमआयडीसी येथील होगानस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील आरोग्य केंद्रास 30 बेड व कोविड प्रतिबंधक साहित्य भेट देण्यात आले. कोरोना च्या संकट काळामध्ये प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जोपासून कोरोना संकट हद्दपार करण्यासाठी मदत करावी असे प्रतिपादन पंचायत समितीचे उपसभापती डॉ. दिलीप पवार यांनी केले. होगानस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड अहमदनगर यांच्या यांच्या सहकार्याने व नवजीवन प्रतिष्ठानच्या माध्यमातून नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील आरोग्य केंद्रास 30 बेड व कोरोना प्रतिबंधक साहित्य पंचायत समितीचे उपसभापती डॉ. दिलीप पवार व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती मांडगे यांच्या कडे सुपूर्त करण्यात आले यावेळी होगानस कंपनी उत्पादन प्रमुख डॉ  शरद मगर, नवजीवन प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र पवार, पंचायत समितीचे माजी सभापती रामदास भोर, आप्पासाहेब सप्रे,संजय भोर,कामगार नेते बाळासाहेब ढगे, संगीत पवार, संपत रोहकले,जयंत पाठक, अमोल खंडागळे, जयेश कांबळे, जयेश गायकवाड आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना राजेंद्र पवार म्हणाले की, कोरोना संकट काळामध्ये गेले 1 वर्षा पासून सामजिक बांधिलकीतून गरजूंना मदतीचा हात देण्यात आला आहे यावर्षीही होगानस कंपनीच्या माध्यमातून चिचोंडी पाटील येथील आरोग्य केंद्रास 30 बेड व कोविड प्रतिबंधक साहित्य भेट दिले,कोरोनाचे संकट हे राष्ट्रीय आपत्ती आहे कोरोनामुळे प्रत्येकाच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असल्यामुळे प्रत्येकाने मदतीचा हात पुढे करणे गरजेचे आहे.यापुढील काळातही विविध संस्थांच्या माध्यमातून असेच कार्य चालू ठेवू असे ते म्हणाले

   तसेच डॉ. शरद मगर म्हणाले की होगानस कंपनीने सामाजिक बांधिलकीतून वर्षभर विविध उपक्रम  राबवत असतो, कोरोना संकट काळात तर प्रत्येकाने सामाजिक बांधिलकीतून पुढे येऊन मदत करणे गरजेचे आहे.

No comments:

Post a Comment