‘रेमडीसिवर’चा काळा बाजार करणार्‍यांना ठोकून काढू ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, April 8, 2021

‘रेमडीसिवर’चा काळा बाजार करणार्‍यांना ठोकून काढू !

 ‘रेमडीसिवर’चा काळा बाजार करणार्‍यांना ठोकून काढू !

मनसेचे जिल्हा सचिव नितीन भुतारेंचा इशारा..


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः एका बाजुला अन्न व औषध प्रशासन जिल्हयात व शहरात पुरेसा रेमडीसिवर इंजेक्शन चा साठा उपलब्ध आहे असे वृत्तपत्राच्या माध्यमातून जाहीर करतात तर दुसरीकडे त्याच रेमडीसिवर इंजेक्शन साठी रुग्णांच्या नातेवाईकांना गावभर फिरावे लागत आहे फिरूनही ते मिळत नाही त्या मुळे कोणी तरी काळा बाजार करणार्‍याचा पत्ता सांगतात व तेथून ते खरेदी करावे लागते रुग्णांचा गरजेचा फायदा हे रेमडीसिवर इंजेक्शन चा काळा बाजार करणारे हे एजंट लोक करीत असुन अश्या काळा बाजार करणार्‍याची माहिती दिली तर त्यांना जागच्या जागी ठोकून काढू असा इशारा मनसेचे नितीन भुतारे यांनी दिला आहे.
आज जिल्हयात व शहरात रेमडीसिवर  इंजेक्शनची टंचाई भासत चालली असुन कोरोना आजारांवर उपचार घेणार्‍या रूग्णांचे व त्यांच्या नातेवाईकांचे हाल होत आहेत. सर्वत्र भटकंती करुण सुध्दा रेमडीसिवर इंजेक्शन मिळत नसून कुठे मिळालेच तर काळ्या बाजारातून विकत घ्यावे लागत आहे. बाजारभाव पेक्षा दुप्पट , तिप्पट किमतीने ते कोरोना रुग्णांच्या उपचारा करीता ते घ्यावे लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे हाल चालु असुन सरकारचे या काळा बाजार करणार्‍यांवर कुठेही नियंत्रण नाही असेही भुतारे म्हणाले.

No comments:

Post a Comment