कर्जतमध्ये रक्तदान करून महामानवास युवकांचे वंदन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, April 16, 2021

कर्जतमध्ये रक्तदान करून महामानवास युवकांचे वंदन

 कर्जतमध्ये रक्तदान करून महामानवास युवकांचे वंदन


कर्जत ः
क्रांतीसुर्य महात्मा जोतीबा फुले व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर याच्या जयंती निम्मिताने कर्जत येथे भास्कर भैलुमे मिञ मंडळ आणि अभय क्लॉथच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले त्यास
अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला.
रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान‘ असे समजले जाते कारण रक्तदान हेच जीवनदान देत असतेे, जिल्हातील विविध रुग्णालयांमधील व रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. याच अनुषंगाने तरुणाईमध्ये रक्तदानाचे महत्त्व रुजविणे आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने भास्कर भैलुमे मिञ मंडळ आणि अभय क्लॉथच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीसुर्य महात्मा जोतीबा फुले व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निम्मिताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.आ. रोहित पवार म्हणाले, रक्तदान ही आजच्या काळाची गरज आहे. अनेकदा वेळेवर रक्त मिळत नसल्याने मृत्यू होण्याच्या घटना कानावर येतात. त्यामुळे तरुणाईने अधिकाधिक रक्तदान करण्याचे आवाहन केले. शिबिरात जवळपास 65 रक्तदात्यांनी रक्तदान केले. सामान्य जनतेस मदतीचा हात मिळावा, या अनुषंगाने  रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे भास्कर भैलुमे यांनी सांगीतले.
या कार्यक्रमासाठी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार, कॉग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष प्रविण घुले, प्रांत अधिकारी अर्चना नष्टे, तहसिलदार नानासाहेब आगळे, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, मुख्याधिकारी गोंविद जाधव, नगरसेवक सचिन घुले, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनिल शेलार, अभय बोरा, रिपाईचे तालुकाध्यक्ष संजय भैलुमे, रिपाईचे जिल्हाउपाध्यक्ष दत्ता कदम, राष्ट्रवादीचे युवक शहराध्यक्ष  विशाल मेहेञे, ऍड अशोक कोठारी, आघाडीच्या शहराध्यक्षा मनीषा सोनमाळी, कार्याध्यक्षा डॉ शबनम इनामदार,  प्रसाद शहा, रज्जाक झारेकरी, राहुल नवले, भाऊसाहेब तोरडमल, शरद अण्णा म्हस्के, नितीन देशमुख, सत्यजित मच्छीन्द्र, वरद म्हेत्रे, श्रीकांत मारकड अनिल भैलुमे, विशाल काकडे, सचिन शिंदे, शुभम कदम, संतोष आखाडे, किरण भैलुमे, विजय साळवे, करण ओव्हल, सुरज कदम, निलेश भैलुमे, मयुर ओव्हळ, विशाल कटारे, सौरभ कदम, सचिन गोरे, वसंत भैलुमे संतोष भैलुमे, आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment