आ.रोहित पवारांच्या प्रयत्नातून जामखेडची गावे होणार पाणीदार.... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, April 23, 2021

आ.रोहित पवारांच्या प्रयत्नातून जामखेडची गावे होणार पाणीदार....

 जामखेडच्या तीन गावांत साकारतेय प्रत्येकी १७ कि.मी.ची सलग समतल चर

आ.रोहित पवारांच्या प्रयत्नातून जामखेडची गावे होणार पाणीदार.... 



नगरी दवंडी

तालुका प्रतिनिधी 

पाणी व्यवस्थापनासाठी कायम आग्रही असलेल्या आ. रोहित पवारांनी आता जामखेड तालुक्यातील तेलंगशी,सावरगाव, जवळके या तीनही गावांमध्ये प्रत्येकी तब्बल १७ किमी लांबीच्या अंतरावर 'सलग समतल चर' खोदाईचा प्रकल्प हाती घेतला आहे.विशेष म्हणजे जिल्ह्यातील सर्वात लांबीचा हा प्रकल्प आहे. जलसंधारणाच्या माध्यमातून पाणी आडून ते जमिनीत मुरले तर भूगर्भाची पाणीपातळी वाढीस लागणार आहे. कायम दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या गावांच्या विहिरी, बोअरवेल,तळ्यांना पाणी राहणार आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष तर दूर होईलच मात्र वर्षानुवर्षे पडीक असलेल्या माळरानावर देखील शेती फुलणार आहे.

      कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या 'समृद्ध गाव घडवूया' या अभियानांतर्गत कर्जत व जामखेड तालुक्यातील अनेक गावांमध्ये ओढा खोलीकरण, चारी जोड प्रकल्प, खोल सलग समतल चर, नदी खोलीकरण,जुन्या बुजलेल्या पोट चाऱ्यांची दुरुस्ती, चाऱ्यांचे खोलीकरण आदी कामांमुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. आता जामखेडच्या काही गावात होणाऱ्या या सलग समतल चर प्रकल्पामुळे या भागाचे रुपडे पालटणार आहे.सीना व कुकडी प्रकल्पाच्या नियोजनातून जी गावे आत्तापर्यंत पाण्यापासून वंचित राहिली त्या गावातील शेतकऱ्यांना आता आपल्या हक्काचे पाणी मिळू लागले आहे.इथुन पुढे जेवढ्या मोठ्या प्रमाणात शेती ओलिताखाली येईल तेवढ्याच प्रमाणात शासकीय योजनांच्या पाणीसाठ्यात असणारे पाणी सिंचनासाठी साहजिकच कमी पडणार आहे. त्यामुळे पावसाळ्यात पडणारे पाणी जाग्यावरच अडवून ते पाणी जिरवण्यासाठी सलग समतल चरची मुख्य भूमिका असणार आहे.अधिकाधिक लोकसहभाग, सामाजिक संस्थांची मदत घेत आ.रोहित पवार करत असलेल्या जलसंधारण कामांमुळे कर्जत-जामखेडची समृद्धीकडे वाटचाल सुरू आहे.जी गावे या प्रकल्पात स्वतःहून पुढाकार घेतील अशा गावांना आ.पवार मदतही करणार आहेत.विशेष म्हणजे हे काम पाहून आणखी पाच गावेही या प्रकल्पात सहभागी होणार आहेत 'पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरला पाहिजे, याच हेतूने जलसंधारणाची कामे आपण करणार आहोत.सलग समतल चर, ओढा खोलीकरण,माथा ते पायथा,बांधबंदिस्ती आणि त्याचबरोबर लोकजनजागृती हे जलसंधारणाचे सर्व प्रयोग आपण परिपुर्ण राबवणार असल्याचे आ. रोहित पवार यांनी सांगितले.


नेमके काय आहे सलग समतल चर?

       या खोदकामात जास्तीत जास्त पाणी साठवण्याची क्षमता असते.तिथल्या तिथे खोदकाम करून पाणी मुरवून मृदसंधारण करता येते.ही पद्धत खोल जमिनीत वापरली जाते.त्यामुळे कितीही पाणी साठले तरी ते जाग्यावरच जमिनीत मुरते आणि भूगर्भाच्या पाणीसाठ्यात वाढ होण्यास मदत होते.

No comments:

Post a Comment