डॉ.आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून देशाला अनमोल भेट दिली - आ.रोहित पवार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, April 15, 2021

डॉ.आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून देशाला अनमोल भेट दिली - आ.रोहित पवार

 डॉ.आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून देशाला अनमोल भेट दिली - आ.रोहित पवार

संविधान स्तंभाचे उद्घाटन जामखेडच्या वैभवात भर


जामखेड ः
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला संविधानाच्या माध्यमातून अनमोल भेट दिली आहे.संविधानाने प्रदान केलेल्या विचारातूनच ’संविधान स्मृतीस्तंभ’ उभा करण्यात आला आहे. या संविधानाचे महत्व प्रत्येक पिढीला समजले पाहिजे.या स्तंभामुळे आपल्या शहराच्या वैभवात भर पडली आहे.असे प्रतिपादन आ.रोहित पवार यांनी व्यक्त केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त जामखेड शहरातील लक्ष्मी चौकात आंबेडकर सर्कल येथे उभारण्यात आलेल्या संविधान स्मृतीस्तंभाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.स्तंभ उभारणी करण्यात आलेल्या या चौकाचे ’संविधान चौक’ असे नामकरण करण्यात आले आहे.
यावेळी आ.रोहित पवार पुढे म्हणाले, ’डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या मार्गाने आपण सर्वांना बरोबर घेऊन चाललो तर आपल्या देशाची प्रगती ही निश्चित होणार आहे.आपला आणि आपल्या देशाचा विकास करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या विचारांचे अनुकरण करणे काळाची गरज आहे.
पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, पंचायत समितीचे सभापती सुर्यकांत मोरे, सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले, भारतीय बौद्ध महासभेच्या सुरेखा सदाफुले, राजेंद्र पवार, अमोल गिरमे, विकी घायतडक,अक्षय घायतडक, राजन समिंदर, किशोर काबंळे, प्रतिक निकाळजे,रवी सोनवणे, संदीप तुपेरे आदींबरोबर अनेक भिमसैनिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here