महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत गोरेंची इंदिरा हॉस्पिटलकडून फसवणूक - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, April 13, 2021

महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत गोरेंची इंदिरा हॉस्पिटलकडून फसवणूक

 महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत गोरेंची इंदिरा हॉस्पिटलकडून फसवणूक

स्वाभिमानी शेतकरी संघटना करणार तीव्र आंदोलन...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
जामखेड ः जामखेड तालुका येथे भाऊसाहेब गोरे यांच्या आई सौ. शकुंतला भाऊसाहेब गोरे यांना जामखेड इथली इंदिरा हॉस्पिटल येथे पिशवी काडणे साठी नेले असता त्या साठी तुमच्या आई चे ऑपरेशन करावे लागेल. असे इंदिरा हॉस्पिटल इथली डॉ. नी सांगितले अँडमिट करता वेळेस डॉ यांनी सांगितले कि महात्मा फुले योजनेचा लाभ घेतल्यास एक ही रुपय लागणार नाही असे सांगण्यात आले तसेच मी भाऊसाहेब गोरे यांनी जी योजने साठी कागद पत्रे लागत होती ती मी त्याना दिली असता सदर हॉस्पिटल मध्ये अँडमिट करण्यासाठी 10,000 रु. / घेण्यात आले त्या नंतर आँपरेशन साठी पुन्हा 15000रु. व रक्त भरण्यासाठी 5000 रु. घेण्यात आले. तसेच पैसे घेतल्या नंतर याची कुठे ही वाच्यता करू नका असे सांगितले. तरी महात्मा ज्योतिबा फुले योजने अंतर्गत माझी फसवणूक झाली असे माझ्या लक्षात आले असता. मी स्वभीमानी शेतकरी संघटने चे अध्यक्ष मंगेश दादा आजबे यांच्या शी संपर्क साधला असता त्यांना मी सर्व हकिकत सांगितली. यावेळी त्यांनी मला सांगितले कि मी शेतकरी ची फसवणूक होऊ देणार नाही व मी तुम्हाला न्याय मिळवून देईल असे सांगितले. जो पर्यंत तुमचे पैसे मिळत नाहीत तो पर्यंत आम्ही हॉस्पिटल समोर आंदोलन करू असे मंगेश दादा आजबे यांनी सांगितले. सदर अर्जा ची चौकशी करून इंदिरा हॉस्पिटल येथील डॉ. न वर कारवाई करावी व मला न्याय मिळावा असे बोलण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here