देशात कोरोनाचा हाहाकार! 7 दिवसांत 10 लाख कोरोना पॉझिटिव्ह - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, April 14, 2021

देशात कोरोनाचा हाहाकार! 7 दिवसांत 10 लाख कोरोना पॉझिटिव्ह

 देशात कोरोनाचा हाहाकार! 7 दिवसांत 10 लाख कोरोना पॉझिटिव्ह


नवी दिल्ली -
देशात 24 तासांत 1 लाख 84 हजार 372 कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 1 हजार 27 जणांचा मृत्यू झाला आहे. याच कालावधीत 82 हजार 339 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ते घरी परतले आहेत. तर सध्या 13 लाख 65 हजार 704 रुग्ण उपचार घेत आहेत. दरम्यान देशात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने कहर केला असून मागील 7 दिवसात 10 लाखांहून अधिक कोरोना बाधित रूग्णांची नोंद करण्यात आली आहे.
गेल्या वर्षभरापूर्वी थैमान घालणार्‍या कोरोना व्हायरसच्या लाटेपेक्षा या दुसर्‍या लाटेत कोरोना संसर्गाची भिती अधिक गडद असल्याचे दिसून येत आहे. दिवसेंदिवस बाधितांची समोर येणारी संख्या धडकी भरवणारी असून दररोज येणार्‍या आकडेवारीतून ते स्पष्ट होत आहे. देशात नव्या बाधितांचा वाढता आकडा पाहता कोरोना रुग्ण वाढीने सर्वच रेकॉर्ड ब्रेक केल्याचे गेल्या काही दिवसात पाहायला मिळत आहे. देशात आतापर्यंत एक लाख 72 हजारांहून अधिकांचा जीव कोरोनामुळे गेला आहे तर 1 कोटी 38 लाखांहून अधिक कोरोना बाधित झाल्याचे समोर आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सद्यस्थिती अतिशय भयावह आहे. यापूर्वी 10 दिवसात 10 लाख कोरोना बाधितांची नोंद करण्यात येत होती. मात्र वाढणार्‍या नव्या बाधित रुग्णांमुळे आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनापुढं मोठं आव्हान उभं राहिलं आहे. यासोबतच कोरोनामुळे बळी जाणार्‍यांचा आकडा देखील तितक्याच झपाट्याने वाढताना दिसतोय. गेल्या 7 दिवसात 5 हजार 908 कोरोना बाधितांनी आपला जीव कोरोनामुळे गमावला असून या सात दिवसात 5 हजार 900 हून अधिकांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या 7 दिवसांतील कोरोनाची स्थिती - 13 एप्रिल- 1,84,372 बाधितांची नोंद, 1027 मृत्यू, 12 एप्रिल- 1,61,736 बाधितांची नोंद, 879 मृत्यू, 11 एप्रिल- 1,68,912 बाधितांची नोंद 904 मृत्यू, 10 एप्रिल- 1,52,879 बाधितांची नोंद 839 मृत्यू, 09 एप्रिल- 1,45,384 बाधितांची नोंद 794 मृत्यू, 08 एप्रिल- 1,31,968 बाधितांची नोंद 780 मृत्यू, 07 एप्रिल- 1,26,789 बाधितांची नोंद 685 मृत्यू.

No comments:

Post a Comment