ग्रामीण रुग्णालय चिचोंडी पाटील येथे कोव्हिड लसीकरण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, April 13, 2021

ग्रामीण रुग्णालय चिचोंडी पाटील येथे कोव्हिड लसीकरण

 ग्रामीण रुग्णालय चिचोंडी पाटील येथे कोव्हिड लसीकरण


नगरी दवंडी/प्रतिनिधी
चिचोंडी पाटील ः नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये कोव्हिड लसीकरण करण्यात येत आहे. लस घेण्यासाठी सकाळी लवकरच लोकांनी रांगा लावल्या होत्या.साधारणपणे पन्नास लोकांना लस देण्यात आली.
रुग्णालयांमध्ये कोरोनाचे बरेच रुग्ण आहेत. त्यामुळे रुग्णालयात सामाजिक अंतर राखून मास्क व सॅनिटायझर चा वापर करूनच लस देण्यात येत आहे.परिसरातील ग्रामस्थांनी कोरोनाची लस घ्यावी असे आवाहन ग्रामीण रुग्णालय चिचोंडी पाटील येथे करण्यात आले.
ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच ,सदस्य व ग्रामविकास अधिकारी देविदास मोरे यांनी लस घेण्यासाठी ग्रामस्थांना प्रोत्साहित केले. जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले,पंचायत समितीचे सभापती सुरेखा संदीप गुंड, मा. सभापती प्रवीण कोकाटे , मा उपसरपंच शरद पवार यांनी कोरोना लसीबाबत जनजागृती केली व जास्तीत जास्त लोकांनी लस घ्यावी असे आवाहन केले.
याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ.समुद्र,अधिपरिचारिका राजहंस सिस्टर, कार्यालयीन कर्मचारी तोडमल आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here