चिचोंडी पाटील येथे कोरोना चाचण्या व लस उपलब्ध करावी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, April 15, 2021

चिचोंडी पाटील येथे कोरोना चाचण्या व लस उपलब्ध करावी

 चिचोंडी पाटील येथे कोरोना चाचण्या व लस उपलब्ध करावी

माजी उपसरपंच शरद पवार यांची मागणी.


चिचोंडी पाटील -
नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील ग्रामीण रुग्णालयात ीीं-लिी/रपींळक्षशप टेस्ट पुन्हा सुरू करून रिपोर्ट 24 तासाच्या आत सबंधित रुग्णास व संबंधित ग्रामपंचायतला कळविण्यात यावे, तसेच कोरोना रोगाचा प्रादुर्भाव पाहता कोव्हीड 19 लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध करावी अशी मागणी चिचोंडी पाटील चे माजी उपसरपंच शरद भाऊ पवार, दिलीप कांकरिया,चंद्रकांत पवार, प्रल्हाद खांदवे, संतोष कोकाटे, युवराज हजारे आदींनी ग्रामीण रुग्णालय प्रशासन,डॉक्टर व कर्मचार्‍यांकडे केली आहे.
गेल्या काही दिवसापासून चिचोंडी पाटील येथे कोरोना लस उपलब्ध झालेली होती परंतु लाभार्थी वाढल्याने मागणी करूनही लस चा पुरवठा मागणी प्रमाणे होत नाही.
कोव्हिड लस चा तुटवडा होत असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.तरी सदर लस ची जिल्हा रुग्णालय अहमदनगर यांच्याकडे जादा मागणी करावी,
स्वतंत्र लॅब टेक्निशन नियुक्ती करावी, रुग्णालयामध्ये कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तींची माहिती संबंधित ग्रामपंचायतला देणे व चिचोंडी पाटील पंचक्रोशीतील नागरिकांची कोविड पॉझिटिव्ह संख्या वाढत असल्याने ज्यादा बेडची व्यवस्था करणे व त्यांच्या जेवणाची व्यवस्था ठेवणे या व इतर मागणीसाठी ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर नेवसे,डॉक्टर कांबळे मॅडम, रुग्णालय कर्मचारी सचिन तोडमल यांची भेट घेऊन युवानेते शरदभाऊ पवार,दिलीप कांकरिया,संतोष कोकाटे मेंबर, चंदुकाका पवार, प्रल्हाद खांदवे, युवराज हजारे यांनी ही मागणी केली.रुग्णालय प्रशासन,डॉक्टरांनी लवकरात लवकर या सर्व बाबी पूर्ण करू असे सांगितले. ग्रामस्थांच्या समस्या अडीअडचणी रुग्णालय प्रशासनाकडे मांडल्याबद्दल ग्रामस्थांमधून माजी उपसरपंच शरद भाऊ पवार यांचे कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment