चिचोंडी पाटीलसह परिसरात विकेंड लॉकडाऊनला उत्स्फूर्त प्रतिसाद - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, April 13, 2021

चिचोंडी पाटीलसह परिसरात विकेंड लॉकडाऊनला उत्स्फूर्त प्रतिसाद

 चिचोंडी पाटीलसह परिसरात विकेंड लॉकडाऊनला उत्स्फूर्त प्रतिसाद


नगरी दवंडी/प्रतिनिधी
चिचोंडी पाटील ः कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील परिसरात शासनाने ठरवून दिलेल्या विकेंड लॉकडाऊनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. ग्रामस्थांकडून पूर्णपणे बंद पाळण्यात आला.सर्व दुकानदार, भाजीविक्रेते,व्यापारी प्रशासनास सहकार्य करीत असल्याचे दिसून येत आहे.नगर तालुक्यासह चिचोंडी पाटील परिसरात अत्यावश्यक सेवा वगळता टपरी, जनरल स्टोअर्स,चहाची दुकाने, इलेक्ट्रॉनिक दुकाने,चप्पल,कपडे, भांडी, खेळणी दुकाने, केस कर्तनालय स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आली आहेत.
अत्यावश्यक सेवेतील वैद्यकीय सेवा,औषधे,फळे व भाजीपाला, किराणा दुकान,दुग्धजन्य पदार्थ, पिठाची गिरणी आदी चालू आहेत त्यासाठीही मास्क सॅनिटायझर वापरणे,सोशल डिस्टन्स पाळणे अत्यावश्यक आहे. चिचोंडी पाटील सह परिसरातील भातोडी, आठवड , सांडवे , दशमी गव्हाण, टाकळी काझी,निंबोडी,येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी ग्रामस्थांना मास्क व सॅनिटायझर वापरा,सामाजिक अंतर राखून काळजी घेण्याचे आवाहन केले.चिचोंडी पाटील गावात ग्रामस्थ, व्यापार्‍यांनी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.शासनाने घालून दिलेल्या नियम व अटींचे पालन ग्रामस्थ करीत असल्याची माहिती मा.उपसरपंच शरद पवार, पंचायत समितीचे मा.सभापती प्रवीण कोकाटे,मा.सरपंच अंजना पवार आदींनी दिली. तसेच नगर तालुक्यातील भातोडी या गावात पाहणी केली असता सर्वत्र शुकशुकाट होता. सर्व दुकाने व्यवसाय बंद होते.भातोडी चे उपसरपंच राजूभाई पटेल,उर्दू स्कूल कमिटीचे मा.अध्यक्ष फकीर मोहम्मद पटेल, मा. उपसरपंच भरत लबडे,राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे नगर तालुकाध्यक्ष पापामिया पटेल,वि. का.सेवा सोसायटीचे मा. चेअरमन रफिक मामू शेख,मातोश्री उद्योग समूहाचे अशोक तरटे,शिवसेनेचे निसारभाई शेख,भाजपा चे श्याम घोलप आदींनी भातोडी गावामध्ये कोरोणा संबंधी जनजागृती केली.तसेच पारगाव येथे सर्वांनी बंद पाळला. गावामध्ये सामाजिक अंतर राखले जात असून सर्वजण मास्क व  सॅनिटायझरचा वापर करत आहेत अशी माहिती पंचायत समितीच्या सभापती सुरेखा संदीप गुंड यांनी पत्रकार सोहेल मनियार यांना दिली. तसेच नगर जामखेड राज्य मार्गावरील दशमी गव्हाण गावामध्ये फेरफटका मारला असता सर्वत्र शुकशुकाट पहावयास मिळाला.ग्रामस्थांनी कोरोना विषाणूचे गांभीर्य लक्षात घेऊन नियमांचे पालन करत आहेत.मास्क व सॅनिटायझर वापरत आहेत अशी माहिती सरपंच संगीता कांबळे, उपसरपंच बाबासाहेब काळे, मार्केट कमिटीचे संचालक उद्धव कांबळे, साई आनंद उद्योग समूहाचे अमोल काळे यांनी दिली.तसेच सांडवा गावची पाहणी केली असता ग्रामस्थांकडून बंदला उस्फूर्त प्रतिसाद दिसून आला. परिसरातील सर्व व्यवहार बंद होते.मी शेतकरी ग्रुपचे संस्थापक आसिफ शेख सर यांनी कोरोणा विषयी जनजागृती करून मास्क व सॅनिटायझर चे महत्त्व ग्रामस्थांना पटवून दिले.
तसेच नगर तालुक्यातील स्मार्ट ग्राम आठवड येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने सर्व व्यवहार बंद ठेवले.आठवड चे सरपंच राजेंद्र मोरे,उपसरपंच बाबासाहेब मोरे, मार्केट कमिटीचे मा.सभापती बाबासाहेब गुंजाळ,मोरया पेट्रोलियमचे शरद गुंजाळ, ग्रामपंचायत सदस्य शरद मोरे, ग्रामपंचायत सदस्य अशोक चोभे आदींनी ग्रामस्थांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले.
सर्वांनी घरातच राहावे,आरोग्याची काळजी घ्यावी,प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन नगर तालुका पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here