मा.सभापती प्रवीण कोकाटे यांच्या स्वखर्चातून कोव्हिड सेंटरमधील शेडला ग्रीन नेट - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, April 9, 2021

मा.सभापती प्रवीण कोकाटे यांच्या स्वखर्चातून कोव्हिड सेंटरमधील शेडला ग्रीन नेट

 मा.सभापती प्रवीण कोकाटे यांच्या स्वखर्चातून कोव्हिड सेंटरमधील शेडला ग्रीन नेट



नगरी दवंडी/प्रतिनिधी
चिचोंडी पाटील ः कोरोणाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे चिचोंडी पाटील (ता. नगर) येथील ग्रामीण रुग्णालयात सुरू असलेल्या कोवीड सेंटर मधील बाधितांची संख्या सातत्याने वाढत असून बेडची संख्या अपुरी पडत आहे.बेड संख्या वाढविण्याच्या दृष्टीने रुग्णालयातील मध्यभागी असलेल्या शेडला ग्रीन नेट बसविणे गरजेचे होते.या संदर्भात  उपजिल्हाधिकारी अजित थोरबोले , तहसीलदार  उमेश पाटील आदींनी चिचोंडी पाटील ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरला भेट दिली असता रुग्णालयात बेड संख्या वाढविणे गरजेचे आहे परंतु या ठिकाणी शेडला ग्रीन नेट नसल्याने बेडची संख्या वाढवता येत नव्हती त्यामुळे अधिकार्‍यांनी केलेल्या विनंतीस प्रतिसाद देत मा.सभापती इंजि.प्रविण कोकाटे यांनी स्वखर्चातून पंचवीस हजार रुपये इतक्या किमतीचे ग्रीन नेट बसविण्याचे काम तातडीने पूर्ण करून घेतले.
त्यामुळे साधारणपणे तीस बेड संख्या वाढण्यास मदत होणार आहे.याचा मोठा फायदा नगर तालुक्यातील रुग्णांना होणार आहे.बेड अभावी हॉस्पिटलमध्ये रुग्णास दाखल करता येत नव्हते. दिवसेंदिवस कोरोना पेशंटची संख्या वाढतच जात आहे.बेड अभावी कोरोणा आजारात रुग्णांची हेळसांड होत होती. रुग्णालयात रुग्णांना दाखल करता येत परंतु आता चिचोंडी पाटील येथील ग्रामीण रुग्णालयातील कोव्हिड सेंटरमध्ये साधारणपणे तीस बेड उपलब्ध झाले आहेत. नगर तालुक्यातील रुग्णांना याचा मोठा फायदा होणार आहे असे प्रतिपादन मा. सभापती इंजिनिअर प्रवीण कोकाटे यांनी केले.
या सहकार्याबद्दल मा.सभापती इंजि. प्रविण कोकाटे यांचे उपजिल्हाधिकारी श्री.अजित थोरबोले , तहसिलदार श्री.उमेश पाटील ,पं.स.आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती मांडगे,वैद्यकीय अधीक्षक डॉ.नेवसे,डॉ.कांबळे आदींनी आभार व्यक्त केले.

No comments:

Post a Comment