राष्ट्रीय पाठशाळेस युकेचे आय.एस.ओ. मानांकन प्राप्त - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, April 6, 2021

राष्ट्रीय पाठशाळेस युकेचे आय.एस.ओ. मानांकन प्राप्त

 राष्ट्रीय पाठशाळेस युकेचे आय.एस.ओ. मानांकन प्राप्त



नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः
येथील राष्ट्रीय पाठशाळा हायस्कूल या विद्यालयास गुणवत्तापूर्ण व्यवस्थानाच्या कार्याबद्दल आय.एस.ओ. 9001-2015 चे मानांकन मिळाले. या आय.एस.ओ. मानांकनाचे प्रमाणपत्र महापालिका शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी सुभाष पवार व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक प्रा. सुनिल पंडित यांच्या हस्ते राष्ट्रीय पाठशाळेचे मुख्याध्यापक जगन्नाथ बोडखे यांना प्रदान करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करुन हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मनपाचे विषयतज्ञ अरुण पालवे उपस्थित होते.
प्रशासकीय अधिकारी सुभाष पवार म्हणाले की, राष्ट्रीय पाठशाळा हायस्कूल विद्यालयाने कात टाकली आहे. या शाळेने अमूलाग्र बदल केल्याचे दिसत आहे. या संस्थेचे सेक्रेटरी अ‍ॅड. विद्याधर काकडे यांच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळे व मार्गदर्शनाने तसेच मुख्याध्यापक जगन्नाथ बोडखे व सर्व शिक्षकांच्या परिश्रमामुळे शाळेचे रुप बदलले आहे. म्हणूनच गुणवत्तापूर्ण व्यवस्थापनासाठी आय.एस.ओ. मानांकन मिळवणारी खाजगी अनुदानित व्यवस्थापनाची ही पहिली शाळा आहे. शहरातील या मराठी माध्यमाच्या शाळेला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. शाळेने पूर्वी अनेक स्वातंत्र्य सैनिक व उच्च पदस्थ अधिकारी घडविलेले आहेत. ही शाळा पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करत असल्याचे सांगितले. जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रा.सुनील पंडित म्हणाले की, माझा व या शाळेचा नोकरीला सुरुवात केल्यापासूनचा संबंध आहे. या शाळेने अनेक अधिकारी व नेतेसुध्दा घडविलेले आहेत. मध्यंतरी या शाळेला थोडी अवकळा आली होती. परंतु अ‍ॅड. विद्याधर काकडे यांच्या नेतृत्वाखाली संस्था व्यवस्थापनाने या शाळेत मोठा बदल केला आहे. या शाळेच्या विकासासाठी मुख्याध्यापक जगन्नाथ बोडखे व सर्व शिक्षक झटत असून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देत आहेत. गत् वर्षभर कोरोनामुळे येथील शिक्षक ऑनलाईन पद्धतीने गुणवत्तापूर्ण शिक्षण देत आले आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी शाळेत विविध उपक्रम राबविण्यात आले आहे. यामुळे सर्वत्र क्षेत्रात शाळेचे विद्यार्थी चमकत आहे. शाळेच्या  या सर्व उपक्रमाची दखल घेऊन युके एकेडीटेरिंग फोरम लिमिटेड या संस्थेच्या वतीने शाळेस आय.एस.ओ. मानांकन प्राप्त झाले आहे.
विषयतज्ञ अरुण पालवे यांनी 2007 सालापासून सर्वच शाळाच्या संपर्कात असून, या कालावधीत राष्ट्रीय पाठशाळेत अमुलाग्र बदल घडले आहेत. शाळेचा गुणवत्तेचा आलेख वाढत आहे. ही ऐतिहासिक वारसा जपणारी शाळा असून, येथे आता सर्व सुविधा उपलब्ध झाल्या असल्याचे सांगितले.

No comments:

Post a Comment