आज शहरात ५२६ तर जिल्हयात २०२२ कोरोना रुग्ण. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, April 9, 2021

आज शहरात ५२६ तर जिल्हयात २०२२ कोरोना रुग्ण.

 आज शहरात ५२६ तर जिल्हयात २०२२ कोरोना रुग्ण.नगरी दवंडी

नगर-  जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा आजही दोन हजार पार आहे. आज शुक्रवारी दुपारी 3 वाजेपर्यंत जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत 2022 ने भर पडली.शासनाच्यावतीने ती दिवसापासून मिनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. मात्र लॉकडाऊनच्या तिसर्‍या दिवसानंतरही कोरोना बाधितांचा आकडा हा वाढताच असून चिंता व्यक्त केली जात आहे. 

नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. नियमाचे पालन केले तर कोरोनाला आपण हरवू शकू. वाढत्या कोरोना बाधितांमुळे चिंता व्यक्त केली जात असून आज नगर शहरातील आकडेवारी आज 526 असून दुसर्‍या क्रमांकावर पुन्हा संगमनेर 169 तर पाथर्डी 146 चा आकडा गाठत तिसरा क्रमांकावर आहे. तसेच आज आढळलेल्या एकूण रुग्णांमध्ये राहाता 137, कोपरगाव 132, अकोले 120, कर्जत 114, श्रीरामपूर 114, नगर ग्रामीण 113, राहुरी 86, जामखेड 70, श्रीगोंदा 60, भिंगार कन्टेंमेंट 57, नेवासा 54, शेवगाव 52, पारनेर 43, इतर जिल्हा 27, इतर राज्य 02 या प्रमाणे कोरोना बाधित आढळून आले आहेत.

आज शुक्रवारी दुपारी 3 वाजेपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 527, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 579 आणि अँटीजेन चाचणीत 916 रुग्ण बाधीत आढळले.जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 235, संगमनेर 37, पाथर्डी 56, राहाता 02, कोपरगाव 42, अकोले 02, कर्जत 23, श्रीरामपूर 24, नगर ग्रामीण 18, राहुरी 03, जामखेड 30, श्रीगोंदा 17, भिंगार कन्टेंमेंट 30, नेवासा 03, पारनेर 01, इतर जिल्हा 04 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 167, संगमनेर 109, पाथर्डी 02, राहाता 88, कोपरगाव 35, अकोले 42, कर्जत 03, श्रीरामपूर 36, नगर ग्रामीण 25, राहुरी 15, जामखेड 03, श्रीगोंदा 03, भिंगार कन्टेंमेंट 18, नेवासा 08, पारनेर 10, इतर जिल्हा 13, इतर राज्य 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज 916 जण बाधित आढळून आले. मनपा 124, संगमनेर 23, पाथर्डी 88, राहाता 47, कोपरगाव 55, अकोले 76, कर्जत 88, श्रीरामपूर 54, नगर ग्रामीण 70, राहुरी 68, जामखेड 37, श्रीगोंदा 40, भिंगार कन्टेंमेंट 09, नेवासा 43, शेवगाव 52, पारनेर 32, इतर जिल्हा 10 अशा रुग्णांचा समावेश आहे.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी नियमित मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, नियमित हात स्वच्छ धुवावे असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here