तर पालकमंत्रींना भाजप जिल्ह्यात फिरू देणार नाही : - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, April 19, 2021

तर पालकमंत्रींना भाजप जिल्ह्यात फिरू देणार नाही :

 तर पालकमंत्रींना भाजप जिल्ह्यात फिरू देणार नाही : वसंत लोढा यांचा इशारा
नगरी दवंडी

नगर – करोनाच्या आलेल्या संकटात कोणतेही राजकारण न करता या संकटातून सर्व जनतेला बाहेर काढायचे आहे. मात्र राज्य सरकारला व प्रशासनाला या परिस्थितीचे गांभीर्य राहिलेले नाहीये. सर्व उपाययोजना कमी पडत आहेत. नगर जिल्ह्यातही करोनाचा हाहाकार माजलेला असून देशातील जास्त संख्या असलेल्या टॉप टेन जिल्ह्यात नगरचा समावेश झाला आहे. राज्य सरकारचा निष्काळजीपणा, चुकीचे धोरण व जिल्हा प्रशासनाचा नियोजन शून्य व ढिसाळ कारभारा मुळे जिल्ह्यातील परिस्थिती प्रशासनाच्या हात बाहेर गेली आहे. भारतीय जनता पार्टी सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी ठामपणे उभी असून जोवर होत असलेला सर्वप्रकारचा काळाबाजार थांबून रुग्णांना सर्व सुविधा तातडीने मिळणार नाही तोवर शांत बसणार नाही. आज सोम्य भूमिका घेत व राजकारण न करता पालकमंत्रींना मागण्यांचे निवेदन दिले आहे. करोनाच्या नियंत्रणासाठी जर तातडीने चांगल्या उपाययोजना राबवल्या नाहीतर भाजप पालकमंत्रींना जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशारा भाजपचे माजी शहराध्यक्ष वसंत लोढा यांनी दिला.

शहर भाजपच्या वतीने पालकमंत्री हसन मूश्रीफ यांची जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेवून विविध मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी माजी नगराध्यक्ष अभय अगकर, उपाध्यक्ष सचिन पारखी, उमेश साठे आदी उपस्थिती होते.

यावेळी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, जिल्ह्यात रेमडीसिव्हचा काळा बाजार राजरोसपणे सुरु आहे. सामान्य नागरिकांना रेमडीसिव्हर व बेड मिळत नाहीत यामुळे अनेक जणांना आपल्या जीवाला मुकावे लागले आहे. बेड व रेमडीसिव्हर, आक्सिजन मिळत नसल्याने नागरिकांना आपल्या कुटुंबियांचे मरण डोळ्यासमोर पहावे लागत असून अनेक रुग्णांचे नातेवाईक बेड व रेमडीसिव्हर, आक्सिजन साठी दिवस रात्र फिरत आहेत. या संकट काळात काहीजण परिस्थीचा गैरफायदा घेत नागरीकांची लुट करत माणुसकीला काळिमा फासत आहेत. यात मोठ्याप्रमाणात सर्वसामान्य, गरीब नागरिक अक्षरशः भरडला जात आहे. तसेच यासर्व गोष्टीसाठी नागरिकांची राजरोसपणे लुट सुरू आहे. या सर्व गोष्टींना राज्य सरकारचे चुकीचे धोरण व जिल्हा प्रशासनाचा निष्काळजीपणा व ढिसाळ कारभार कारणीभूत ठरत आहे. तातडीने यात सुधारणा झाली नाहीतर भाजप शांत  बसणार नाही.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here