कोतवाली पोलिसांकडून प्रवाशांना लुटणारी सराईत टोळी जेरबंध - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, April 9, 2021

कोतवाली पोलिसांकडून प्रवाशांना लुटणारी सराईत टोळी जेरबंध

 कोतवाली पोलिसांकडून 4 लाखाचा मुद्देमाल जप्त

  प्रवाशांना लुटणारी सराईत टोळी जेरबंधअहमदनगर ः प्रवाशांना आपल्या वाहनात बसवून त्यांना मारहाण करून त्यांचे एटीएम कार्ड, मोबाईल, रोख रक्कम बळजबरीने काढून घेणार्‍या एका सराईत गुन्हेगारांच्या टोळीस कोतवाली पोलिसांच्या पोलीस पथकाने या टोळीकडून होंडा सिटी कार, लोखंडी रोड, कोयता, 3 मोबाईल फोन असा 4 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कोतवाली पोलिसांनी छडा लावून चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत अशी माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी दिली.

आरोपीमध्ये राभम भागाजी बुगे (रा. बुगवाडी, ता. पारनेर, जि.अ.नगर) व साथीदार विनोद सुधाकर पाटोळे. (रा. बहिरवाडी, जेऊर, ता. नगर, जि. अनगर ,) आकाश संतोष नायकी, (रा.जामगांव, ता, पारनेर, जि. अनगर ) व एक विधी संघर्षीत बालक असे त्यांची नावे आहे. अंबरनाथ सांगळे हे दि. 2 एप्रिल रोजी सुमारास त्याना एका कारने माळीवाडा बसस्थानक येथुन प्रवासी म्हणून वसवुन निमगाव वाघा शिवार येथे घेवुन जावुन लोखंडी रॉड ने मारहाण केली. त्यांचेकडील मोबाईल, रोख रक्कम व कागदपत्रे बळजबरीने काढून घेतले. तसेच दि. 4 एप्रिल रोजी एटीएम त्यासंदर्भातील गुन्हा दाखल होता. गुन्ह्यातील वापरलेलो होन्डासिटी कार व आरोपी हे पारनेर व जामगाव परिसरातील असल्याचे पोलिसांना खब-याद्वारे माहिती मिळाली, सदरचे आरोपी हे नेप्तीरोडने येणार असल्याच्या माहिती वरून कोतवाली पोलिसांनी सापळा लावून त्याना मोठ्या शिताफीने पकडले. आरोपीची कसून तपासणी केल्यानंतर त्यानी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच त्यांनी एमआयडीसी पोस्टे, हद्दीत व नगर तालुका पो.स्टे. हहोत गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी दि. 3 एप्रिल रोजी फिर्यादी अंबरनाथअर्जुन सांगळे ( वय-41 रा. सिन्नर जि नाशिक) यांनी फिर्यादी दिली होती.

पकडलेल्या घेतलेल्या आरोपी मधील आरोपी राभम भागाजी बुगे याच्यावर वर शिर्डी, दौंन्ड, पुणे, मनमाड, दादर रेल्वे सीएसटी रेल्वे , कोतवाली पोस्टे , एमआयडीसी , नगर तालुका पोस्टे अशा एकुण 22 गुन्हे दाखल आहेत. तर विनोद सुधाकर पाटोळे याच्यावर 13 गुन्हे दाखल आहेत. तर आकाश संतोष नायकी याच्यावर पाच गुन्हे दाखल आहेत. सर्व गुन्हे हे चोरी व जबरि चोरी संदर्भातील आहेत सदर गुन्ह्याचा पुढील तपास हा सपोनि विवेक पवार हे करित आहेत. ही कारवाई ही  पोलीस अधिक्षक मनोज पाटील , अपर पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल , उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील सो, यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राकेश मानगांवकर व गुन्हे शोध पथकाचे सपोनि विवेक पवार, पोना गणेश धोत्रे, पोना विष्णु भागवत, पोना नितीन शिंदे, पोना शाहीद शेख, पोना योगेश भिंगारदिवे, पोना सागर पालवे, पोकाँ भारत इंगळे, पोको सुमित गवळी, पोकों योगेश कवाष्टे, पोकॉ कैलास शिरसाठ, पोका तान्हाजी पवार, पोका सुशिल वाघेला, पोकों सुजय हिवाळे, पोकों प्रमोद लहारे, पोकाँ सोमनाथ राउत , पोको प्रशांत राठोड ( मोबाईल सेल ) यांनी सदरची कारवाई केली आहे.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here