पोलीस नाईक रामदास सोनवणेचे नागरिकांकडून कौतुक. चोरी, गहाळ मोबाईल नागरिकांच्या स्वाधीन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, April 9, 2021

पोलीस नाईक रामदास सोनवणेचे नागरिकांकडून कौतुक. चोरी, गहाळ मोबाईल नागरिकांच्या स्वाधीन

 पोलीस नाईक रामदास सोनवणेचे नागरिकांकडून कौतुक.

चोरी, गहाळ मोबाईल नागरिकांच्या स्वाधीन


अहमदनगर ः ‘मोबाईल’ ही आता जीवनावश्यक बाब म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण अचानक आपला ‘मोबाईल’ चोरी गेला तर.. होय. शहरात मोबाइल चोरीच्या घटना खूप वाढल्या आहेत. 2019 ते 2021 पर्यंत च्या चोरी गेलेल्या मोबाईलच्या तांत्रिक तपास करून तोफखाना पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस नाईक रामदास सोनवणे यांनी 418 नागरिकांना प्राप्त करून दिले आहेत. या एकूण मोबाईलची किंमत 62 लाख 70 हजार रु. इतकी आहे.

तोफखाना पोलीस स्टेशन या अंतर्गत येणारे हद्दीमध्ये तारकपूर पाईपलाईन रोड तपोवन रोड कल्याण रोड मंगळवार बाजार यशोदा नगर बाजार तपोवन रोड बालिकाश्रम रोड प्रोफेसर चौक या ठिकाणी मोबाईल गहाळ झाल्या बाबाच्या तक्रारी पोलिस स्टेशनला येत असतात त्या तक्रारीची दखल घेऊन पोलीस नाईक रामदास सोनवणे यांनी एक चांगली प्रतिमा तयार केली आहे. मोबाईल मिळवून देऊन सर्वसामान्य नागरिकांना पोलिसाबद्दल ची चांगली प्रतिमा निर्माण करण्याचे काम करून नागरिकांचे समाधान केलेले आहे त्यामुळे नागरिकांनी तो खाना पोलिसांचे आभार मानले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here