नगरमधील अमरधाममध्ये कोरोना मृतदेहांचा खच - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, April 9, 2021

नगरमधील अमरधाममध्ये कोरोना मृतदेहांचा खच

 नगरमधील अमरधाममध्ये कोरोना मृतदेहांचा खच

 काल दिवसभरात 42 जणांवर अंत्यसंस्कार. कोविड अंत्यसंस्कारासाठी केवळ 7 कर्मचारी; आज 6 मृतदेह वेटींगवर



नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः नगर जिल्ह्यात आता फक्त कोरोना रुग्ण संख्या वाढत नाही तर कोरोनामुळे एकाच दिवशी मृत्यू झालेल्या संख्येने उच्चांक गाठला. काल अमरधाम मध्ये सरणावर 22 तर विद्युत दाहिनीमध्ये 20 असे एकूण 42 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुळचंद बोरा ट्रस्टचे 5 व अंत्यसंस्कार सहाय्यक मंडळाच्या 2 अशा 7 कर्मचार्‍यांनी अंत्यसंस्कार केले. विद्युत दाहिनीमध्ये अंत्यसंस्कारासाठी बराच वेळ वाट पाहावी लागत असल्यामुळे सरणावर ही विधी करावा लागत आहे. आज दुपारपर्यंत आणखी 6 कोरोना मृतदेह अंत्यविधीसाठी अमरधाममध्ये आले आहे.

अहमदनगरमध्ये कोरोना विषाणू संसर्गाचं भयानक रुप आता समोर येत आहे. कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेत मोठ्या प्रमाणावर सामुहिक संसर्ग होतोय. दोन दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईमध्ये एका सरणावर 8 जणांवर अंत्यंसस्कार केल्याचं समोर आलं होतं. तसाच प्रकार अहमदनगरमध्येही. अहमदनगर महापालिकेसमोर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्याचं आव्हानं उभं राहिलं होतं. शववाहिनीतून एकाचवेळी सहा मृतदेह भरून अमरधाममध्ये नेण्याची नामुष्की महानगरपालिकेवर ओढावलीय. अहमदनगरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असुन कोरोनामुळे आत्तापर्यंत 1500 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा प्रशासनाने काल दिलेल्या आकडेवारीत 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिलीय. त्यामुळे संख्येचा ताळमेळ बसत नाही. अहमदनगर जिल्हयात सध्या 11 हजार 237 अँक्टिव्ह रुग्ण आहेत. अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ कोव्हिड सेंटरमध्ये कोरोनाने मृत्यू झालेल्या 8 जणांवर एकाच सरणावर अंत्यविधी करण्याची दुर्दैवी वेळ अंबाजोगाई नगर पालिकेवर आली. अंबाजोगाई नगर पालिकेने पठाण मांडवा रस्त्यावरील कोव्हिड रुग्णांच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी एकाच सरणावर या 8 जणांना अग्निडाग दिला. व काल अहमदनगर मधील 42 कोरोना रुग्णांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. दरम्यान, महाराष्ट्रात दररोज 50 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण समोर येत आहेत. गुरुवारी महाराष्ट्रात 56 हजार 286 कोरोना रुग्ण आढळले. महाराष्ट्रातमध्ये कोरोनाची दुसरी लाट असून कोरोना मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

No comments:

Post a Comment