अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाला 500 कोटीचा निधी द्या ः डॉ. टकले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, April 7, 2021

अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाला 500 कोटीचा निधी द्या ः डॉ. टकले

 अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाला 500 कोटीचा निधी द्या ः डॉ. टकले


नगरी दवंडी/प्रतिनिधी

नेवासा ः अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाला 500 कोटींचा निधी द्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉ.कृषीराज टकले यांनी कार्यकर्त्यांच्या आयोजित केलेल्या एका बैठकीत केली.        
   स्वाभिमानी मराठा महासंघाचे नाशिक विभागीय कार्याध्यक्ष रावसाहेब कावरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत डॉ.टकले बोलत होते.
    मराठा आरक्षण, शेतकरी आत्महत्या, वाढती बेरोजगारी यांसारखे मोठे गंभीर प्रश्न आज मराठा समाजाच्या समोर आहेत. मराठा समाजातील सुशिक्षित बेरोजरागांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने अण्णासाहेब पाटील विकास मंडळाची स्थापना केली आहे. मात्र या महामंडळास कर्ज प्रकरणासाठी 500 कोटीचा निधी दिल्यास बेरोजगारी कमी होऊन मराठा तरुणांना रोजगार मिळू शकेल असेही मत यावेळी महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉ. कृषीराज टकले यांनी वक्त केले.                            
    यावेळी बोलताना रावसाहेब कावरे म्हणाले की, मराठा तरुणांना सध्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यापैकीच बेरोजगारी हाही एक मोठा यक्षप्रश्न समाजातील तरुणांसमोर आहे. संघटनेच्या माध्यमातून मराठा तरुणांना सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करू.
    यावेळी स्वाभिमानी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सुभाष गागरे, युवक प्रदेशाध्यक्ष कैलास रींधे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष अर्चना धुळे, मराठा सुकाणू समितीचे गणेश झगरे, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख अमोल म्हस्के आदींनी मनोगत वक्त केले.
     या बैठकीस युवकचे जिल्हाअध्यक्ष योगेश गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष किशोर लोढे, युवकचे नेवासा तालुकाध्यक्ष नीलेश बारहाते, महिला आघाडीच्या मनिषा फरतडे, उपाध्यक्ष कल्पना शेटे आदी उपस्थित होते.बैठकीचे सूत्रसंचालन अंकुश डांभे यांनी केले तर शेवटी रावसाहेब कावरे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment