कुकडीचे आवर्तन 25 एप्रिल रोजी सोडण्यासाठी जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांना भेटणार ः सुपेकर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, April 17, 2021

कुकडीचे आवर्तन 25 एप्रिल रोजी सोडण्यासाठी जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांना भेटणार ः सुपेकर

 कुकडीचे आवर्तन 25 एप्रिल रोजी सोडण्यासाठी जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांना भेटणार ः सुपेकर

जलसंपदा राज्य मंत्री ना. बच्चू कडू यांना मुंबई येथे भेटून 25 एप्रिल रोजी कुकडीचे आवर्तनं सोडण्याबाबत विनंती करणार असल्याचे तालुकाध्यक्ष सुरेश सुपेकर आणि शहराध्यक्ष माधव बनसोडे यांनी सांगितले.

नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा  ः श्रीगोंदा -कुकडी लाभ क्षेत्रांमधील पारनेर, श्रीगोंदा ,कर्जत, करमाळा या तालुक्यांना उन्हाळी आवर्तन 25 एप्रिलला सोडावे अशी मागणी प्रहार संघटनेच्या वतीने तालुकाध्यक्ष सुरेश सुपेकर आणि शहराध्यक्ष माधव बनसोडे यांनी श्रीगोंदा तहसीलदार प्रदीप पवार आणि कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांना निवेदनाद्वारे केली.                      

कुकडीचे आवर्तन 9 मे रोजी सोडण्याचा निर्णय हा पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा या तालुक्यातील शेतकर्‍यांच्या विरोधात असून या आवर्तनाला होणार्‍या विलंबामुळे या तालुक्यातील शेतातील उभी पिके आडवी होऊन या पिकांचा खकाना होऊन शेतकर्‍यांचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे.
 बैठकीत झालेला निर्णय बदलून कुकडीचे आवर्तन 9 मे ऐवजी पंधरादिवस अगोदर म्हणजे 25 एप्रिल रोजी सोडावे अशी मागणी प्रहार संघटनेच्या वतीने तालुकाध्यक्ष सुरेश सुपेकर आणि शहराध्यक्ष माधव बनसोडे यांनी श्रीगोंदा तहसीलदार प्रदीप पवार आणि कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here