घोसपुरी येथे वीज पडून 14 शेळ्या दगावल्या - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, April 13, 2021

घोसपुरी येथे वीज पडून 14 शेळ्या दगावल्या

 घोसपुरी येथे वीज पडून 14 शेळ्या दगावल्या


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः घोसपुरी (ता. नगर ) येथे आज (सोमवारी दि.12) दुपारी वीज पडून 14 शेळ्या दगावल्याची झाल्याची घटना घडली आहे. बाळासाहेब दातीर व भगवान बुलाखे हे शेळ्या चारण्यासाठी परिसरातील माळरानावर गेले होते. दरम्यान दुपारी दोन च्या सुमारास विजांचा कडकडाट सुरु झाला. यानंतर काही क्षणातच वीज शेळ्यावर पडल्याने 14 शेळ्या जागीच ठार झाल्या. जि. प. सदस्य संदेश कार्ले यांनी प्रशासनास याची खबर दिल्याने तलाठी व पशुसांवर्धन विभागातील अधिकार्‍यांनी मृत शेळ्यांचा पंचनामा केला.
शनिवारपासून अहमदनगर जिल्ह्यासह तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यानंतर आजही तालुक्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावले असून शेतकर्‍यांची दाणादाण उडत आहे.

No comments:

Post a Comment