"या" गावात पाच दिवसांचा जनता कर्फ्यू : रॅपिड टेस्ट मध्ये आढळले 10 बाधित
नगरी दवंडी
अहमदनगर : नगर तालुक्यातील साकतखुर्द येथे कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली असून गुरुवारी (दि.1) झालेल्या रॅपिड टेस्ट कॅम्प मध्ये गावातील 9 व वाळुंज येथील 1 असे 10 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. गावामध्ये अजूनही मोठया संख्येने बाधित रुग्ण असल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे. गावात भीतीचे साम्राज्य पसरले असून सर्वांचेच धाबे दानाणले आहेत.यामुळे गावात पाच दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.
नगर तालुका शहराजवळ असल्याने शहरालगत असणाऱ्या गावांमध्ये सध्या कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तालुक्यात सध्या जास्त पेशंटची संख्या ही अकोळनेर वडगाव गुप्ता, शिंगवे, अरणगाव, नेप्ती, नवनागापूर, खंडाळा, निंबळक, बुऱ्हाणनगर येथे असून आता त्या पाठोपाठ साकतखुर्द चा नंबर लागला असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान नगर तालुक्यातील गावांना शहराच्या जवळीकतेचा सर्वाधिक फटका बसत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. ज्यावेळी बाधितांची संख्या अतिशय कमी प्रमाणात होती त्यावेळी गावोगावच्या वेशी बंद झाल्या होत्या. खेड्यापाड्यातील गावांमध्ये कमालीची काळजी घेतली जात होती. परंतु कोरोना आता गोवोगावच्या उंबऱ्या पर्यंत येऊन ठेपला असताना मात्र ग्रामीण भागातली लोकं निष्काळजी पणाने वागताना दिसत आहेत. कोरोना दारावर दस्तक देत असताना आता खरोखर काळजी घेण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
पाच दिवस जनता कर्फ्यू -
साकतखुर्द येथे कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे अकोळनेरच्या पार्श्वभूमीवर येथील ग्रामस्थांनी सुद्धा गावपातळीवर पाच दिवस कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता शुक्रवार दि. 2 ते दि. 6 या कालावधीत पहाटे सहा ते रात्री 12 वाजेपर्यंत गाव बंद राहणार आहे. यावेळेत नागरिकांनी कोव्हीड 19 नियमांचे काटेकोर पालन करावे, विनाकारण फिरू नये असे आवाहन उपसरपंच बाबासाहेब चितळकर यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment