नविन सरपंच, नविन ग्रामपंचायत, जुनेच कामकाज योगेश चंदन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, March 20, 2021

नविन सरपंच, नविन ग्रामपंचायत, जुनेच कामकाज योगेश चंदन

नविन सरपंच, नविन ग्रामपंचायत, जुनेच कामकाज योगेश चंदन

श्रीगोंदा  ः श्रीगोंदा तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींची चुरशीची निवडणुक होउन सरपंच उपसरपंच निवड झाली. निवडून आलेल्या सदस्यांनी काट्याचा संघर्ष करत सरपंच उपसरपंचपद मिळवली आहेत, सदस्या पैकी काहींना सरपंच उपसरपंच पद मिळाली तर काहींची संधी थोडक्यात हुकली. काही सत्ताधारी तर काही विरोधी सदस्य झाले आहेत. गावात विकास कामे करताना विरोधकांना काय विचारायच, त्यांची कामेच नाही करायची अस सत्ताधारी म्हनत आहेत, आणि विरोधी सदस्यांनी सत्ताधार्‍यांना काम करू द्यायचे नाहीं असे म्हणत कंबर कसली आहे. तर नवीन सदस्य आता खुप कामे करायचेत, गाव आदर्श करायचय खुप विकास करायचाय असा विचार बोलुन दाखवत आहेत. मात्र हा अशावाद करताना सदस्य मागील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच आणि बॉडीला विकासकामे जमलीच नाही त्यांनी चुकीचंच केलय अशा चर्चा पण करत आहेत. नागरिकांच्या निवडून आलेल्या सर्व नविन पदाधिकार्‍यांच्याकडुन आपेक्षा वाढलेल्या असल्याने पदाधिकारी देखिल नकळत ग्रामपंचायतला किती निधी आहे, या निधीतून कोणकोणती काम करु शकतो याची संपुर्ण माहीती न घेता लोकांना अश्वासन देत आहेत. त्यातच पंचायत समीती प्रशासन मिशन मोडवर काम करत घरकुलं मंजुर करणे, लाभार्थीस जागा उपलब्ध करुन देणं, घरकुल पुर्ण करुन घेण या विवंचनेत कुठलीही सुट्टी न घेता ग्रामपंचायत कर्मचार्‍यांकडून काम करून घेत असल्याने याचा परीणाम ग्रामपंचायत प्रशासनावर पडत आहे. त्यातच सर्व नवीन पदाधिकारी सदस्य ग्रामपंचायत मध्ये जावुन ग्रामपंचायत कर्मचारी यांचेवर तुटुन पडत आहेत, नवनविन आदेश देत आहेत, बरेच जण बँक खात्यांची माहीत घेत आहेत. तालुक्यात ग्रामसेवकांची खुप पदे रिक्त असल्याने अनेकांना दोन तीन चार्ज आहे, त्यात पंचायत समिती व जिल्हा परीषद यांचेकडुन घरकुलांसाठी सुरु असलेला प्रचंड प्रेशर मुळ ग्रामसेवक व पालक अधिकारी घरकुल कामात व्यस्त असल्याने त्यांना नवीन पदाधिकार्‍यांची कामे करताना कसरत करावी लागत असून परीणामी नविन पदाधिकार्‍यांना आपले ग्रामसेवक नको वाटत असल्याने आपल्या गावाला स्वतंत्र ग्रामसेवक हवा आहे आणि मागणी गटविकास अधिकार्‍यांकडे केली जात आहे. गावात अजुन नविन कामे सुरु न झालेने सर्व पदाधिकारी नाराज आहेत आणि सर्वांनी हे समजुन घेणं गरजेचं आहे की सत्ताधारी व विरोधक हे निवडणुकीनंतर विसराव लागणार असून. नवीन सरपंचांना सत्ता मिळाल्याने त्यांना 5 वर्ष कुटुंबप्रमुख म्हनुन कामकाज करत इतरांना विरोधी सदस्य म्हनुन न बोलता त्यांना तुमची काम आपण नक्की करू आपन सर्वजन मिळुन करु विकासकामे करु, काही चुकलं तर हक्काने सांगा अस बोलुन विश्वासात घेतलं तर ते देखील सोबत येतील कारण ते देखील निवडुन आलेले आहेत त्यांना सुद्धा काम करुन घ्यायचे आहेत, आणी विरोधकांनी देखील लक्षात घ्यायला हवं कसंही असो आता ते सरपंच उपसरपंच आहेत. त्यांचे नशाबाने त्यांना पदं मिळाली आहे, त्यांचे शिवाय तुम्ही कोणतेही कामं करु शकनार नाहीत, त्यामूळे त्यांना पुर्ण सहकार्य करत एकत्रीत मिळुन काम सुरु केले तर अधिकारी देखील साथ देतील. तसेच ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचार्‍यांवर असलेला दबाव देखील कमी करा कारण 200 ते 250 रु रोजाने कुणी खुरपायला देखील येत नाही, परंतु हे सर्वजण याच पगारात काम करतात, त्यानां प्रेमाणे आधार द्या बघा ते तुमच्या पुढ पळतील. राहीलं ग्रामसेवकांच आगोदर हे समजुन घ्या की ते ग्रामपंचायतीचे कर्मचारी नाहीत ते जिल्हापरीषदेचे कर्मचारी आहेत. त्यांना जिल्हापरीषदेच्या आदेशाने तुमच्या गावचे सचिव म्हनुन म्हणजेच तुम्हाला मार्गदर्शन करुन काम करुन घेणे व त्याच्यावर नियंत्रण ठेवणेसाठी शासनानं पाठवलं आहे. त्या मुळ ते प्रथम त्यांचे अधिकारी सांगतील तेच आदेश पाळणार आहेत. ग्रामसेवकांचा पद रिक्त असलेने शक्यतो स्वतंत्र ग्रामसेवक मिळतच नाही ही वस्तुस्थीती आहे, त्यामुळ त्यांना विश्वासात घ्या ते तुम्हाला विविध कामांचे प्रस्ताव करुन देतील, काम सुरु करायच्या मार्ग सांगतील, त्यांच्याकडे एकाच वेळी अनेक काम सुरु करायचा आट्टाहास न धरता एक एक काम सुरु करा, तुम्हाला खुप दिवस काम कायची आहेत, बहुतेक योजनांचा निधी वर्षातुन एकदाच येत असतो, तो नियोजनबद्ध खर्च करा, तसेच पूर्वीच्या पदाधिकार्‍यांनी खुप अनुभव घेतलेला असतो त्यांना मोठेपणा द्या मार्गदर्शन घ्या ते तुम्हाला ग्रामविकासात येणार्‍या अडचणी व त्यावर मार्ग कसा काढायचा ते नक्की सांगतील. त्यामूळे काही दिवस ऊत्साही कार्यकर्ते यांच्या वाद ऊत्पन्न होणार्‍या सल्ल्यांकडे दुर्लक्ष करा, परमेश्वराने तुम्हाला सेवेची खुप मोठी संधी ऊपलब्ध करुन दिली आहे त्या संधीचे सोनं करा, पहा कितीतरी आत्मीक समाधान व आनंद तुम्हाला तुमच्या कार्यातुन मिळेल.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here