नागवडे कारखान्याची सत्ता खाजगी कारखानदारांना हातात घेऊ देणार नाही : मगर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, March 27, 2021

नागवडे कारखान्याची सत्ता खाजगी कारखानदारांना हातात घेऊ देणार नाही : मगर

 नागवडे कारखान्याची सत्ता खाजगी कारखानदारांना हातात घेऊ देणार नाही : मगर


श्रीगोंदा ः
गुरुवार दि.25 रोजी नागवडे साखर कारखान्याची वार्षीक सर्वसाधारण सभा ऑनलाईन (झुम) द्वारे घेण्यात आली. या सभेला कारखाना प्रशासनाने आजी माजी सभासदांना , आमदारांना निमंत्रण दिले पाहिजे असताना मर्जीतील लोकांनाच सभेची ऑनलाईन लिंक पाठवत झालेल्या बैठकीत घाणरडे राजकारण पहावयास मिळाले. कारखान्याचे कार्यकारी संचालक तर चेअरमनच्या घरचे नोकर असल्या सारखे वागत होते.आगामी नागवडे कारखाना निवडणुकीत केशवभाऊ मगर , आण्णासाहेब शेलार यांच्या बरोबर राहणार असल्याचे राष्ट्रवादीचे घनश्याम शेलार यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष केशवभाऊ मगर, आण्णासाहेब शेलार, जिजाबापू शिंदे उपस्थित होते.

   पुढे बोलताना घनश्याम शेलार म्हणाले की , झुमवर सभा करताना योग्य मार्गदर्शन केले पाहिजे होते नवीन 5000 टन प्रकल्पाची मंजुरी घेण्यासाठी ही सभा घेतली, या प्रकल्पास किती खर्च येणार हे सभासदांना सांगितले पाहिजे, कारखान्यावर कर्ज असताना नविन प्रकल्प करायला संचालक मंडळाचीच मान्यता नसून, या प्रकल्पाला सर्वांचा विरोध असुन या बाबत आपण तक्रार करणार आहोत. सभासदांची कामधेनु टिकली पाहिजे कारखान्यात मनमानी कारभार होऊ देणार नाही असे शेलार यांनी सांगितले.
   नागवडे कारखाना निवडणुक बिनविरोध व्हावी अशी आमची इच्छा आहे.पण खाजगी कारखाण्याच्या चेअरमनास नागवडे कारखान्याचे चेअरमनपद देण्यास आमचा विरोध असल्याचे आण्णासाहेब शेलार यांनी सांगितले. स्व.बापुच्या नावाने हॉस्पिटल काढावे ते हॉस्पिटल कारखान्याचे मालकी हक्काचे असावे. स्व.शिवाजीराव नागवडे यांच्या स्मारकाच्या पायाभरीणीसाठी 42 लाखाचा मुरुम वापरला तर कोरोना काळात राज्यात सर्वत्र लॉकडाऊन असताना 17 लाख 82 हजार रु.प्रवास इंधन खर्च झाल्याचे वार्षिक अहवालात दाखवत कामात भष्ट्राचार झाल्याचे शेलार यांनी सांगितले .
   नागवडे कारखान्याच्या अध्यक्षांनी कोट्यावधी रुपयांचा भष्ट्राचार केला आहे.त्यांनी नागवडे कारखान्यासाठी जुन्या मोटारी खरेदी केल्या आहेत. परभणी आणि कराड येथील खाजगी साखर कारखाने त्यांनी घेतले आहेत. तसचे पुणे, कोईमतुर येथील टेक्सटाईल कंपनीत त्यांची भागीदारी आहे. आपली कामधेनु असलेला साखर कारखाना बंद पडण्याची वेळ आपल्यावर येवू नये असे कारखान्याचे उपाध्यक्ष केशवभाऊ मगर म्हणाले
.

No comments:

Post a Comment