राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या श्रीगोंदा तालुकाध्यक्षपदी खेतमाळीस - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, March 11, 2021

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या श्रीगोंदा तालुकाध्यक्षपदी खेतमाळीस

 राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या श्रीगोंदा तालुकाध्यक्षपदी खेतमाळीस


नगरी दवंडी/प्रतिनिधी

श्रीगोंदा ः श्रीगोंदा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी विजय खेतमाळीस यांची निवड करण्यात आली असून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष विनोद बोणगे, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष शुभम बंब, प्रदेश सरचिटणीस सौरभ देशमुख, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष गजानन भांडवलकर, कार्याध्यक्ष विशाल म्हस्के, उपाध्यक्ष प्रसाद कर्णावट, यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
   श्रीगोंदा शहर तसेच तालुक्यात विद्यार्थ्यांचे कुशल संघटन, प्रमुख महाविद्यालयांवर विजय खेतमाळीस यांची असलेली पकड लक्षात घेऊन राष्ट्रवादीचे प्रदेशउपाध्यक्ष घनश्याम शेलार आणि माजी आमदार राहुल जगताप यांनी पुढाकार घेत तालुकाध्यक्षपदी विजय खेतमाळीस यांची निवड केली. निवडीनंतर श्रीगोंदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हरिदास शिर्के, युवकचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड, सा.न्यायचे तालुकाध्यक्ष संदीप उमाप, सुशीलकुमार शिंदे, माजी तालुकाध्यक्ष नितीन थोरात, यांसह सर्वांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here