श्रीगोंदा पोलिसांच्या कामगिरीवर पोलिस अधीक्षकांनी मारली कौतुकाची थाप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, March 4, 2021

श्रीगोंदा पोलिसांच्या कामगिरीवर पोलिस अधीक्षकांनी मारली कौतुकाची थाप

 श्रीगोंदा पोलिसांच्या कामगिरीवर पोलिस अधीक्षकांनी मारली कौतुकाची थाप


नगरी दवंडी/प्रतिनिधी

श्रीगोंदा ः श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पेंडींग गुन्ह्याची निर्गती जलद केल्या प्रकरणी पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी समाधान व्यक्त करत पोलीसांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकत सन्मानित केल्याने श्रीगोंदा पोलिसांचे मनोबल वाढले आहे.
याबाबत अधिक माहिती आशी की श्रीगोंदा पोलिसांची रेकोर्ड तपासणी काल दिं. 3 मार्च रोजी करण्यात येऊन त्यावेळी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी गुन्ह्यांची निर्गती जलद गतीने करत गुन्ह्यांची पेंडसी कमी केल्या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्याला भेट देऊन पोलिस निरीक्षक रामराव ढिकले, सहायक पोलिस निरीक्षक विठ्ठल पाटील, सहाय्यक फौजदार भानुदास नवले, पोलिस हेड कॉन्स्टेबल रोहिदास झुंजार, विठ्ठल बडे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकत सन्मानित केले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी आण्णासाहेब जाधव उपस्थित होते. पोलिसांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकल्याने श्रीगोंदा पोलिसांचे मनोबल वाढले आहे. त्याच प्रमाणे तालुक्यांतील टाकळी कडेवळीत याठिकाणी माळरानावर शीर नसलेला अज्ञात मृतदेह सापडला असता श्रीगोंदा पोलिसांनी सुतावरून स्वर्ग गाठत अवघ्या दोन दिवसांत मृतदेहाच्या खुनाचा तपास करून गुन्हेगारांना अटक करत गुन्ह्याचा छडा लावल्या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्याचे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपनिरिक्षक दिलीप तेजनकर, पोहेकॉ अंकुश ढवळे, पोकॉ प्रकाश मांडगे, पोकॉ दादा टाके,पोकॉ किरण बोराडे,पोकॉ अमोल कोतकर,पोकॉ विनायक जाधव,पोकॉ संजय काळे,पोकॉ गोकुळ इंगवले,पोकॉ राजु भोर,पोकॉ किरण जाधव, मपोकॉ लता पुराणे त्याच बरोबर सायबर सेलचे पोकॉ प्रशांत राठोड यांना अहमदनगर येथे पोलिस अधीक्षक कार्यालयात खास सन्मानित करणार आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here