नैतिक जबाबदारी स्विकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा ः आ. पाचपुते - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, March 23, 2021

नैतिक जबाबदारी स्विकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा ः आ. पाचपुते

 नैतिक जबाबदारी स्विकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा ः आ. पाचपुते

     आंदोलनापूर्वी सर्व भाजपा नगरसेवक व कार्यकर्त्यांनी पाचपुते यांच्या माऊली निवासस्थानी एकत्र येऊन स्वर्गीय खासदार कै. दिलीपजी गांधी यांना भावपुर्ण श्रधांजली वाहिली. यावेळी पाचपुते यांनी गांधी साहेबांची पक्षनिष्ठा व काम करण्याचा झपाटा यांचे विशेष कौतुक केले.

श्रीगोंदा-
महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर होत असलेले भ्रष्टाचाराचे आरोप, राज्यात बिघडलेली कायदा व सुव्यवस्था, महिलांवर वाढत चाललेले अत्याचार आणि यावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरलेल्या भ्रष्टाचारी सरकाराविरोधात आ. बबनराव पाचपुते यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी श्रीगोंदा यांच्या वतीने आज सोमवार दि. 22 मार्च रोजी श्रीगोंदा शनीचौक येथे मुख्यमंत्री व गृहमंत्री महाराष्ट्र यांनी नैतीक जबाबदारी स्विकारून राजीनामा देण्याची मागणी करण्यासाठी निदर्शने व आंदोलन करण्यात आले.

यावेळी बोलताना आ.बबनराव पाचपुते म्हणाले की, सरकार मधील मंत्री विकासकामे सोडुन खंडणी गोळा करण्याचे काम करत आहेत. तर काहींवर महिलांवरील अत्याचारा सारखे गंभीर आरोप झालेले आहेत तरी देखील या निगरगट्ट सरकारला जाग येत नाही. जनतेच्या मनातील भावना ओळखुन भारतीय जनता पार्टी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. यांनी राजीनामा न दिल्यास भविष्यात आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आ. पाचपुते यांनी दिला.
   यावेळी बाळासाहेब महाडिक, संदीप नागवडे, नगरसेवक रमेश लाढाणे, संतोष खेतमाळीस, बापुतात्या गोरे, अशोक खेंडके, राजेंद्र उकांडे, जयश्री कोथींबीरे, सुहासिनी गांधी, शहाजी खेतमाळीस, सुनील वाळके, संग्राम घोडके, अंबादास औटी, संतोष क्षिरसागर,सुधीर खेडकर, महेश लांडे, महावीर पटवा, दिपक हिरनावळे, महेश क्षीरसागर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here