कोरेगव्हाण परिसरात आढळला बिबट्यांचा संचार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, March 20, 2021

कोरेगव्हाण परिसरात आढळला बिबट्यांचा संचार

 कोरेगव्हाण परिसरात आढळला बिबट्यांचा संचार


नगरी दवंडी/प्रतिनिधी

श्रीगोंदा ः श्रीगोंदा तालुक्यातील कोरेगव्हाण परिसरात बिबट्यांचा संचार आढळून आल्याने एकच खळबळ उडाली असून येथील शेतकरी शेतातील कामे करण्यासाठी घराबाहेर पडण्यास घबरात आहेत.वन विभागाने या बिबट्याचा तातडीने बंदोबस्तकरावा अशी मागणी कोरेगव्हाण परिसरातील शेतकर्‍यांकडून होत आहे.
   कोरेगव्हाण येथील शेतकर्‍यांच्या पाळीव प्राण्यांचा बिबट्याने पाडलेला असून परिसरातील शेतकर्‍यांचा ऊस तुटून गेल्याने बिबट्याला निवारा राहिला नसल्याने बिबट्याने नागरी भागात आपला मोर्चा वळवला आहे. मागील आठवडाभरापासून ह्या परिसरात बिबट्यांची दहशत वाढलेली आहे . त्यामुळे परिसरातील शेतकर्‍यांच्या उपजीविकेवर तसेच व्यवसायावर परिणाम होत आहे. त्यातच वीज वितरण कंपनीने शेतीसाठी रात्रीचा वीजपुरवठा  केला असल्याने परिसरातील शेतकर्‍यांना पिकाला पाणी देण्यासाठी रात्री - अपरात्री जावे लागते. त्यातच परिसरामध्ये बिबट्याचा वावर वाढल्याने  शेतकरी पिकाला पाणी देण्यासाठी शेतात जाण्यास घबरात आहेत. रात्री पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या अनेक शेतकर्‍यांना बिबट्यांचे दर्शन झाल्यामुळे रात्रीच्या वेळी घराबाहेर जाण्यास घाबरत आहेत. वन विभागाने या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी कोरेगव्हाण परिसरातील शेतकर्‍यांकडून होत आहे. या बाबत वनविभागाचे आर एफ ओ. रवींद्र भोगे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here