अतिक्रमणे नियमात करून घरकुलांसाठी शासकीय जागा देण्यात यावी : धेंडे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, March 11, 2021

अतिक्रमणे नियमात करून घरकुलांसाठी शासकीय जागा देण्यात यावी : धेंडे

 अतिक्रमणे नियमात करून घरकुलांसाठी शासकीय जागा देण्यात यावी : धेंडे


नगरी दवंडी/प्रतिनिधी

श्रीगोंदा ः अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक गावातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकुल करण्याबाबत नॅशनल दलीत मूव्हमेंट फॉर जस्टिस या सामाजिक संघटनेतर्फे श्रीगोंदा तहसील कार्यालयांच्या नायब तहसीलदार डॉ. योगिता ढोले व पंचायत समिती गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांना निवेदन देण्यात आले.
   सर्वांसाठी घरे या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना अतिक्रमित जागा निवासासाठी उपलब्ध करून देण्याचा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्यातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याबाबतचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्या नुसार अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक गावातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकुल करण्याबाबत नॅशनल दलीत मूव्हमेंट फॉर जस्टिस या सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय महासचिव डॉ. ड. केवल जी उके, राज्य सचिव वैभव जी गीते, यांच्या आदेशाने अहमदनगर जिल्हाध्यक्ष प्रेरणा धेंडे व पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक दादा जाधव, पुणे निरीक्षक पांडुरंग गडेकर व दौंड शहर अध्यक्ष प्रकाश पारदासानी, श्रीगोंदा तालुका अध्यक्ष पारधी परिवर्तन परिषदचे दिगंबर काळे, तालुका उपाध्यक्ष विजय भोसले, बाळू आप्पा जाधव यांनी दि.10 रोजी श्रीगोंदा तहसील कार्यालयांच्या नायब तहसीलदार डॉ. योगिता ढोले व पंचायत समिती गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांना निवेदन दिले.  यावेळी सागर काळे,माडरे काळे, ईश्वर काळे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment