रविंद्र भापकर यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, March 4, 2021

रविंद्र भापकर यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड

 रविंद्र भापकर यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड


नगरी दवंडी/प्रतिनिधी

श्रीगोंदा ः तालुक्यातील कोळगाव (भापकरवाडी) येथील राज्य राखीव पोलीस दलात पोलिस नाईक म्हणुन कार्यरत असलेले रवींद्र बाळासाहेब भापकर यांची खात्यांतर्गत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत 305 गुण मिळवत उत्तुंग यश संपादन करत पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाली.
   कोळगाव येथील रवींद्र बाळासाहेब भापकर हे 2012 साली राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 7 दौंड येथे पोलीस नाईक पदावर भरती होऊन सुमारे 8 वर्ष सेवा बजावली पोलिस दलात नोकरी करताना होणारी कसरत करत 2017 साली खात्यांतर्गत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या विभागीय परीक्षेत 305 मार्क मिळवत घवघवीत यश संपादन केले. पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झालेली झाल्याने कोळगाव परिसरात तसेच त्यांच्या मित्रपरिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here