ग्राम बालसंरक्षण समिती प्रशिक्षण कार्यशाळा शेवगाव व पाथर्डीमध्ये संपन्न - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, March 20, 2021

ग्राम बालसंरक्षण समिती प्रशिक्षण कार्यशाळा शेवगाव व पाथर्डीमध्ये संपन्न

 ग्राम बालसंरक्षण समिती प्रशिक्षण कार्यशाळा शेवगाव व पाथर्डीमध्ये संपन्न

नगरी दवंडी/प्रतिनिधी
शेवगाव ः शेवगाव दि.17/03/2021 रोजी तालुका शेवगाव व पाथर्डी येथे श्री.संजय कदम(जिल्हा कार्यक्रम अधिकारी),श्री. एस. जी. पाटील (जिल्हा महिला व बालविकास अधिकारी), एस. ए. राशिनकर (परिविक्षा अधिकारी), श्री.वैभव देशमुख (जिल्हा बाल संरक्षण अधिकारी), जि. अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती शितल खिंडे (गट विकास अधिकारी  पाथर्डी) ,श्री. महेंद्र दराडे (बाल विकास प्रकल्प अधिकारी पाथर्डी)व श्री. एस.एस.ढाकणे (बाल विकास प्रकल्प अधिकारी शेवगाव)तालुका संरक्षण अधिकारी सचिन जाधव,गोवर्धन वीर यांच्या उपस्थितीत ग्राम बाल संरक्षण समितीचे सदस्य सचिव अंगणवाडी सेविका व ग्राम बाल संरक्षण समिती सदस्य पोलिस पाटील यांचे प्रशिक्षण घेण्यात आले.
    सदर प्रशिक्षण दोन सत्रांमध्ये  कोविड- 19 चे नियमांचे  पालन करून घेण्यात आले.कार्यक्रमाचे प्रस्तावना श्रीमती श्रद्धा मुसळे यांनी केले व ग्राम बाल संरक्षण समितीची भुमिका व जबाबदारी,बालविवाह प्रतिबंध कायदा बाल लैंगिक प्रतिबंध कायद्याची माहिती या विषयावर मार्गदर्शन श्री. सर्जेराव शिरसाठ, श्री. प्रकाश   वाघ, श्री. बाळु साळवे जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांनी केले तसेच या प्रशिक्षणामध्ये चाइल्ड लाईन हेल्प लाईन नंबर 1098 ची माहिती चाइल्ड लाईन सदस्यांनी दिली. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीमती रुपाली वाव्हळ यांनी केले.

No comments:

Post a Comment