जप्त केलेल्या 43 वाळू वाहनांच्या लिलावासाठी परवानगीसाठी महसूल विभाग प्रतिक्षेत - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, March 11, 2021

जप्त केलेल्या 43 वाळू वाहनांच्या लिलावासाठी परवानगीसाठी महसूल विभाग प्रतिक्षेत

 जप्त केलेल्या 43 वाळू वाहनांच्या लिलावासाठी परवानगीसाठी महसूल विभाग प्रतिक्षेत

नगरी दवंडी/प्रतिनिधी
राहुरी ः राहुरी तालुक्यात महसूल विभागाने जप्त केलेल्या 43 वाळू वाहनांच्या वसुलीसाठी या वाहनांच्या लिलावासाठी वरिष्ठ कार्यालयात राहुरी महसूल विभागाने मागणी केली असून लिलावासाठी परवानगीसाठी महसूल विभाग प्रतीक्षेत आहे .
    राहुरी महसूल विभागाने अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणार्‍या वाहनांवर यापूर्वी जप्तीची कारवाई केलेली आहे . त्यामुळे जप्त केलेल्या वाहनांच्या मूल्यांकन झालेले आहे . आता राहुरीत महसूल विभागाने उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडे या 43 जप्त केलेल्या वाहनांच्या लिलावासाठी परवानगी मागितली आहे . जप्त केलेल्या वाहनांमध्ये 23 टेम्पो ,पाच ट्रॅक्टर , तीन डंपर , पाच पिकप , छोटाहत्ती , ट्रॅक्टर ट्रॉली ,आधी वाहनांचा समावेश आहे . जप्त करण्यात आलेल्या वाहन मालकांकडे महसूल विभागाची सुमारे 64 लाख 48 हजार रुपये वसुली येणे आहे . जवळपास 43 जप्त केलेल्या वाहनांची वसुली अद्यापही झालेली नाही , त्यामुळे या वाहनांचा लिलाव करून वसुली करण्यासाठी महसूल विभागाने उपजिल्हाधिकारी कार्यालय काकडे परवानगी मागितली आहे , अशी माहिती राहुरीचे तहसीलदार एफ आर शेख यांनी दिली .
   महसूल विभागाने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडून सदर जप्त केलेल्या 43 वाहनांचे मूल्यांकन केले असून 39 लाख 80 हजार रुपये इतके लवकरच परवानगी मिळेल अशी माहिती महसूल विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment