जि.प. प्राथमिक शाळेस स्वच्छतागृहाचे हस्तांतरण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 16, 2021

जि.प. प्राथमिक शाळेस स्वच्छतागृहाचे हस्तांतरण

 जि.प. प्राथमिक शाळेस स्वच्छतागृहाचे हस्तांतरण

 सन फार्मा कंपनीकडून सामाजिक दायित्व निधीतून स्वच्छतागृहाचे हस्तांतरण

नगरी दवंडी/प्रतिनिधी

पिंपळगाव माळवी ः नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस सन फार्मा कंपनीकडून सामाजिक दायित्व निधीतून सर्वसुविधायुक्त स्वच्छतागृहाचे हस्तांतरण कंपनीचे मानव संसाधन विभागाचे व्यवस्थापक बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपळगाव माळविच्या सरपंच राधिका प्रभुणे होत्या.
    यावेळी बोलताना पाटील म्हणाले की ,सन फार्मा कंपनीकडून गावामध्ये फिरत्या दवाखान्याद्वारे आरोग्य सुविधा पुरविण्यात येत असून या सर्व सुविधांना ग्रामस्थांचे सहकार्य मिळत असून यापुढे कंपनी गावांसाठी आधुनिक सुविधा देण्याचा प्रयत्न करेल.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक दत्तात्रय जपे यांनी केले.या कार्यक्रमास उपसरपंच भारती बनकर ,ग्रामपंचायत सदस्य संतोष झिने,सागर गुंड,   बापू बेरड ,इंद्रभान बारगळ,नीलेश छडीदार व   ग्रामस्थ उपस्थित होते .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षक सुनील पाडळे, रविकांत सुसे ,सतीश राठोड, राजेंद्र ठाणगे ,सविता मरभळ, भारजा गायकवाड ,मंगल जावळे यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अंबादास कदम यांनी मानले.  

No comments:

Post a Comment