गारपीटग्रस्तांना नुकसान भरपाई द्या, सभापती प्रशांत गायकवाडांची मागणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, March 27, 2021

गारपीटग्रस्तांना नुकसान भरपाई द्या, सभापती प्रशांत गायकवाडांची मागणी

 गारपीटग्रस्तांना नुकसान भरपाई द्या, सभापती प्रशांत गायकवाडांची मागणी

पिक विमा मिळण्यात अडचणी, खा. पवार, मुख्यमंत्र्यांना प्रशांत गायकवाड यांचे निवेदन
नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः जिल्हयात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पिक विमा मिळणेस असलेल्या अडचणी येत असून या अडचणीतून मार्ग काढण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
   नगर जिल्हयात दि.21 ते 24 मार्च दरम्यान अनेक भागात अवकाळी पाऊस होवून गारपीट झालेली आहे. गारपीटीमुळे शेतकर्‍यांचे कांदा, गहू,हरभरा व इतर रब्बी पिके व फळबागांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून शेतकरी हतबल झालेला आहे. त्यामुळे त्यांना नुकसान भरपाई मिळणे आवश्यक असल्याचेही श्री. गायकवाड यांनी निवेदनात नमुद केले आहे.
   शेतकर्‍यांनी रब्बी पिकांचा विमा उतरवलेला आहे. परंतु विमा कंपनीचे नवीन नियमानुसार पूर्वीप्रमाणे पिकांचे पंचनामे होत नाहीत. नवीन नियमावलीप्रमाणे विमा कंपन्यांना 72 तासाच्या आत त्यांच्या टोल फ्री नंबरवर किंवा इ-मेल आयडी अथवा वेबसाईटवर सदर नुकसानीची माहिती शेतकर्‍यांच्या रजिस्टर मोबाईल नंबर वरून शेतकर्‍यांना स्वतः पाठवावी लागते. असे शेतकरी विमा रक्कम मिळण्यास पात्र असणार आहेत.
   काही सुशिक्षित शेतकरी ही प्रक्रिया पार पाडतील परंतु जिल्ह्यात अजूनही काही शेतकर्‍यांकडे अंड्रॉईड मोबाईल नसून ते या प्रक्रियेबाबत अनभिज्ञ आहेत. त्यामुळे जरी काही शेतकर्‍यांनी आपल्या मोबाईल नंबर वरून नुकसानीची माहिती पाठवली नाही. तरी संबंधित भागातील कृषी विभागाकडून नुकसानीची माहिती घेऊन सरसकट नुकसान ग्रस्त शेतकरी विमा रक्कम मिळणेसाठी पात्र होतील. अशी व्यवस्था शासनामार्फत विमा कंपनीकडून करणे आवश्यक आहे. त्यामुळे या अडचणी बाबत शासनस्तरावर निर्देश देण्यात यावेत अशी मागणी श्री. गायकवाड यांनी सर्व नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या खा.पवार व मुख्यमंत्री तसेच विधान परीषद अध्यक्ष , सदस्य व लोकसभा सदस्यांकडे केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here