वै. नाना महाराज वनकुटेकर अध्यात्मातील धर्मगुरू : आ. लंके - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, March 27, 2021

वै. नाना महाराज वनकुटेकर अध्यात्मातील धर्मगुरू : आ. लंके

 वै. नाना महाराज वनकुटेकर अध्यात्मातील धर्मगुरू : आ. लंके

गणेश मित्र मंडळाच्यावतीने आ. लंकेंची केली पुस्तक तुला...
अन् आमदार लंके यांची केली पुस्तक तुला ....
   गणेश मित्रमंडळ गणपती चौफुला या मंडळाच्या वतीने आमदार लंके यांची पुस्तक तुला करण्यात आली यामध्ये तलाठी ग्रामसेवक भरतीपासून ते जिल्हाधिकारी भरतीची स्पर्धा परिक्षेची 50 किलो पुस्तके आमदार लंके यांना हभप बाळकृष्ण महाराज कांबळे यांना भेट देण्यात आली ही भेट पाहून लंके यानी समाधान व्यक्त केले.

नगरी दवंडी/प्रतिनिधी

पारनेर ः पारनेर तालुक्यालाच नव्हे तर संपुर्ण राज्याला आधात्माचा विचार देऊन समाजाला सन्मार्गावर आणण्याचे काम नाना महाराज वनकुटेकरानी आयुष्यभर केले म्हणुनच नाना हे आधात्मातील धर्मगुरू असल्याचे गौरव उद्गगार आमदार निलेश लंके यांनी काढले.
   पारनेर तालुक्यातील कान्हूरपठार पारनेर रोड वरील गणपती चौफुला विरोली येथील गणेश मंदिरात अयोजीत केलेल्या 32 व्या अखंड हरिनाम सप्ताहाचे सांगताप्रसंगी आमदार लंके यानी सप्ताह कार्यक्रमाला भेट दिली त्या प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी भौतिक अंतराचे पालन करून मोजक्याच भाविकांना मास्क सॅनिटायझरचा वापर करून कार्यक्रम घेण्यात आला .
   आमदार लंके पुढे बोलताना म्हणाले की महाराष्ट्राला वारकरी सांप्रादयाची वैभवशाली परंपरा आहे या परंपरे तुन भारतीय संस्कृती जोपासण्याचे काम केले जाते समाजाला दिशा देण्याचे काम किर्तन प्रवचन माध्यमातुन केले जाते म्हनुनच समाजातील भक्तीभाव आणि एकोपा टिकुण आहे पुढील वर्षाचा 33वा अखंड हरिनाम सप्ताह भव्य आणि देखण्या सांस्कृतिक भवनात केला जाईल अशी ग्वाही दिली .
   महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पारनेर तालुका संपर्क प्रमुख पत्रकार संजय मोरे यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक करून सप्ताहकार्यक्रमाचा लेखाजोखा सादर केला . यावेळी नंदू सोडकर , अमोल धामणे , महेंद्र गायकवाड किरण ठुबे कानिफ शेठ ठुबे , सोनू नवले यांच्या सह परिसरातील भाविक उपस्थित होते

No comments:

Post a Comment