पाच वर्षात राळेगण थेरपाळचा विकासात्मक चेहरा बदलणार : कारखिले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, March 27, 2021

पाच वर्षात राळेगण थेरपाळचा विकासात्मक चेहरा बदलणार : कारखिले

 पाच वर्षात राळेगण थेरपाळचा विकासात्मक चेहरा बदलणार : कारखिले

गेले काही वर्षे सतत दुष्काळ पडत राहिला त्यामुळे गावातील शेतकर्‍यांना पाटाचे येणार पाणी जास्त काळ वापर करता येत नव्हते. माननीय काशीनाथ दाते सर यांना विनंती केल्या नंतर या ठिकाणी आडवा बंधारा मजूर करून काम सुरु करण्यात आले. त्यामुळे म्हसे, राळेगण, गुणोरे या गावातील शेतकर्‍यांना या बंधार्‍याच्या मोठा फायदा होणार आहे.
                                                                                      - पंकज कारखिले
                                                                                  - सरपंच राळेगण थेरपाळनगरी दवंडी/प्रतिनिधी

पारनेर ः तालुक्यातील राळेगण थेरपाळ येथे 14 लाख 90 हजार रुपयांचा कोल्हापूर पद्धतीचा आडवा पाणीसाठा बंधार्‍याचे उदघाटन जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे अध्यक्ष काशीनाथ दाते, शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष रामदास भोसले, पारनेर पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके आदी मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये करण्यात आले.
   यावेळी म्हसे गावचे सरपंच प्रवीण उदमले, बजरंग मदगे, नारायण मदगे, मार्तंड जाधव, राजू शिर्के यांचा हस्ते नारळ फोडून बंधार्‍याच्या कामास सुरवात करण्यात आली.
याप्रसंगी सरपंच पंकज कारखीले, मछिंद्र मदगे, प्रवीण कारखिले, सुखदेव कारखीले, भरत शोतोळे, शिरीष कारखीले, अक्षय पठारे, सुनील सोनवणे, संदीप रासकर, संकेत ढोमे, अक्षय इचके, विशाल रासकर, पप्पू कारखीले, राहुल मोरे, अंकित कारखीले, दीपक कारखीले, शशिकांत कारखीले, नरेश सोनवणे आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here