सुप्याचे सरपंच योगेश रोकडे यांनी स्वखर्चाने सोडले पाणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 23, 2021

सुप्याचे सरपंच योगेश रोकडे यांनी स्वखर्चाने सोडले पाणी

 सुप्याचे सरपंच योगेश रोकडे यांनी स्वखर्चाने सोडले पाणी

रोकडे परिवाराचा कौतुकास्पद उपक्रम....
22 मार्च रोजी राज्यात कोरोना महामारीसारखे महाभयंकर संकट आले त्याला आज एक वर्ष पूर्ण झाले. ज्या प्रमाने मानव जातीला यातून बाहेर पडण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. त्यातून वन्यप्राणी देखील सुटले नाही.आजही त्याचे संकट मानव जातीवर गडद आहे. या सर्व गोष्टींचा सामना करत असताना उद्योजक योगेश रोकडे यांनी सलग दोन वर्षे पाणवठ्यात पाणी सोडून वन्यजीवांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकती थांबवली आहे.  त्यांचे हे काम इतरांसाठी खुप प्रेरणादाई आहे. समाजातील दानशुरांनी त्यांचा आदर्श घेऊन पुढे यावे. खास करून नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच सदस्य यांनी आपआपल्या परीने आपल्या परीसरात वन्यजीवांसाठी मदत करावी.
                                                            - दिपक पवार,
                                           - माजी सभापती, पंचायत समिती पारनेर.


नगरी दवंडी/प्रतिनिधी

पारनेर ः पारनेर तालुक्यातील सुपा परीसरातील  कित्येक दिवस कोरडेठाक असलेल्या पाणवठ्यात सुपा गावचे नवनिर्वाचित सरपंच योगेश रोकडे यांनी स्वखर्चाने पाणी सोडले.  पानवठ्यात पाणी सोडावे असे आवाहन करण्यात आले होते त्यास प्रतिसाद देत रोकडे यांनी पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करणार्या वन जीवांची तहान भागवली आहे.
वाढत्या उष्णतेचा फटका जसा नागरिकांना बसतो तितकाच किंवा त्यापेक्षा जास्त त्रास हा वन्य जीवांना सहन करावा लागतो. तालुक्यात सार्वजनिक वन विभागाच्या वतीने जागोजागी पाणवठे निर्माण केले असले तरी ते पाण्याअभावी कोरडे आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. चालू वर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात होऊन देखील मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच तलाव, केटीवेअर, विहीर, बोअरवेलने तळ गाठला आहे.
    भोयरे गांगर्डा, कडूस, पळवे, बाबुर्डी, वाडेगव्हाण, नारायणगव्हाण, जातेगाव, रूईछत्रपती शहाजापुर, हंगा, सुपा येथे वनक्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. वनक्षेत्रात वन्यप्राण्यांचे वास्तव असल्याने हे प्राणी पाण्यासाठी वणवण भटकत आसतात. पाण्याच्या शोधात ते नागरी वस्तित जातात तेथे त्यांना  कुत्रे किंवा नागरिकाकडून इजा होण्याची शक्यता असते तर काही वन्यप्राणी विहीर शेततळ्यात पडुन जीव गमावतात. वनविभागाच्या जमिनीलगत नगर पुणे महामार्ग असल्याने पाण्याची भटकंती करताना अनेक वन्यजीवांना आपला जीव गमवावा लागला आहे.
     प्राण्यांची पिण्याच्या पाण्यासाठी वनवन थांबावी म्हणून दैनिक ’प्रभात’ने याबाबतचे वृत प्रसिद्ध करत जनतेला पाणी सोडण्याचे आवाहन केले होते. सुपा गावचे सरपंच योगेश रोकडे यांनी या आव्हानाला प्रतिसाद देत बारा हजार लिटर पाणी मान्यवरांच्या उपस्थितीत  वन विभागाच्या पाणवठ्यात सोडले. रोकडे सलग दोन वर्षी झाले सतत वन्यजीवांसाठी पाणवठ्यात पाणी सोडत आहेत. त्यांच्या या उपक्रमांचे परीसरातून कौतुक केले जात आहे.
       यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती  दिपक पवार, शहाजापुरचे सरपंच प्रमोद गवळी, ग्रामपंचायत सदस्य विजय पवार,  वन अधिकारी इपर मॅडम, अमोल मैड, सुरेंद्र शिंदे, अमोल गवळी, कृष्णा कोल्हे, दादा गवळी, संचित मगर, बाबु पवार, रघुनाथ इपर, नाना म्हस्के आदी यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment