मुलभुत गरजांना प्राधान्य देत सुपा गावचा नियोजनबद्ध विकास करणार ः रोकडे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, March 2, 2021

मुलभुत गरजांना प्राधान्य देत सुपा गावचा नियोजनबद्ध विकास करणार ः रोकडे

 मुलभुत गरजांना प्राधान्य देत सुपा गावचा नियोजनबद्ध विकास करणार ः रोकडे


नगरी दवंडी/प्रतिनिधी

पारनेर ः निवडणुका संपल्या राजकारण संपले, गावातील सर्वांना बरोबर घेऊन गावचा सर्वांगीन विकास करणार आहोत, रस्ते, विज, पाणी, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन या मुलभुत गरजांना प्राधान्य देत सर्वाना बरोबर घेत सुपा गावचा नियोजन बद्ध विकास करणार असल्याचे प्रतिपादन सुपा गावच्या सरपंच नवनिर्वाचित मनिषा योगेश रोकडे यांनी केले.पारनेर तालुक्यातील सुपा येथील तीन रस्ताच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचा शुभारंभ रोकडे यांच्या हस्ते पार पडला यावेळी त्या बोलत होत्या.
   यावेळी उपसरंपच सागर मैड, माजी उपसभापती दिपक पवार, माजी सरपंच विजय पवार,  सदस्य दत्तात्रय पवार, विजय सर्जेराव पवार, विलास पवार, प्रताप शिंदे, सुरेश नेटके आदी मान्यवर उपस्थितीत होते.  प्रभाग क्र. पाच मधील भुतारे गल्लीतील  120 मीटर रस्ता, प्रभाग क्रमांक  तीन मधील डॉ. मगर समोर 20 मीटर रोड व डॉक्टर साळुके निवासा समोरील 25 मीटर रोडच्या कामाचा प्रांरभ करण्यात आला.वरील तीनही रस्ते ग्रामपंचायतीच्या स्वनिधीतुन करण्यात येणार असल्याची माहिती उपसरपंच सागर मैड व ग्रामविकास अधिकारी अशोक नागवडे यांनी दिली.
   यावेळी सामाजिक कार्यकर्ते योगेश रोकडे, सुभाष शिंदे, अविनाश पवार, संतोष पंडीत, सुनिल चव्हाण, शहाजी नांगरे, काळे, जावेद तांबोळी, बाळासाहेब पवार, अमोल मैड, राजु गवळी, मनोज सोनार,  पवार सर, नारायण पवार, आमृत चव्हाण यांच्या सह ग्रामस्थ मोठ्या उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here