निघोजच्या उपसरपंचाकडून तलाठ्याला मारहाण ः गुन्हा दाखल, उपसरपंचाला अटक - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, March 11, 2021

निघोजच्या उपसरपंचाकडून तलाठ्याला मारहाण ः गुन्हा दाखल, उपसरपंचाला अटक

 निघोजच्या उपसरपंचाकडून तलाठ्याला  मारहाण ः गुन्हा दाखल, उपसरपंचाला अटक


नगरी दवंडी/प्रतिनिधी

पारनेर ः पारनेर तालुक्यातील निघोजच्या नवनिर्वाचीत उपसरपंच  ज्ञानेश्वर विठ्ठल वरखडे यांनी निघोजच्या  तलाठ्याला मारहान केली. या बाबतचा तलाठी विनायक निंबाळकर यांनी पारनेर पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे.याबाबत  अधिक माहीती अशी की, निघोजचे उपसरपंच यांचा एक कार्यकर्ता तलाठी निंबाळकर यांच्याकडे  काम घेवून गेला व म्हणाला मला सरपंचाने पाठवले आहे माझे काम करा, तेव्हा
   तलाठी म्हणाले  तुम्हाला थांबावे लागेल माझ्या समोर काम चालू आहे.  हि घटना उपसरपंच यांना कार्यकर्त्यांने  फोनवर सांगताच ,उपसरपंच वरखडे यांनी तलाठी कार्यालयात प्रवेश करून निंबाळकर यांना शिवीगाळ करुन मारहान केली.
   याबाबतचा गुन्हा तलाठी  निंबाळकर यांनी पारनेर पोलिस ठाण्यात दाखल केला आहे.  त्यानंतर पारनेर पोलिसांनी तातडीने आरोपी ज्ञानेश्वर वरखडे याला अटक केली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षकघनशाम बळप करत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here